How to Eat Amla : हिवाळ्यात वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्यांसोबतच वेगवेगळी फळं खाण्याची चांगली मजा असते. त्यात सगळ्यात जास्त जर काही खाल्ले जात असतील ते म्हणजे आवळे. आंबट, गोड, तुरट लागणारे आवळे सगळ्यांना आवडतात. आवळा हे एक सुपरफूड मानलं जातं. कारण यात अनेक पोषक तत्व असतात. आवळ्यांनी इम्यूनिटी वाढते, वजन कमी होतं, केस आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
सामान्यपणे भरपूर लोक आवळे कच्चे खातात आणि काही लोक आवळ्याचा मुरांबा खातात. पण अनेकांना आवळे खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. आयुर्वेद Dr. Nambi Namboodiri यांनी आवळ्या खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. डॉक्टरांनुसार, आवळे नेहमीच मिठासोबत खावेत. तसेच त्यांनी हेही सांगितलं की, लहान आवळा जास्त फायदेशीर असतो की, मोठा.
मिठासोबत आवळा खाण्याचं कारण
आयुर्वेदात एकूण ६ रस आहेत. डॉक्टरांनुसार, आवळ्यामध्ये खारट सोडून सगळे रस असतात. त्यामुळे मिठासोबत ते खावेत. आवळा मिठासोबत खाल्ल्यानं तो संपूर्ण बनतो आणि त्याचा आंबटपणाही बॅलन्स होतो. तसेच आवळ्यात फायदेही अधिक वाढतात.
डॉक्टरांनी सांगितलं की, आवळ्यामध्ये दोन मुख्य गुण असतात. त्याना धात्री आणि रसायनी म्हटलं जातं. धात्रीचा अर्थ आईसारखी रक्षा करणं आणि रसायनी म्हणजे पोषण देणे. म्हणजे आवळा शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव तर करतोच, सोबतच पोषणही देतो.
आवळा खाण्याची योग्य वेळ
आवळे तुम्ही रोज खाऊ शकता. यासाठी वर्षभर पुरेल या हिशेबाने आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवा. आवळ्याला मीठ लावू ठेवा आणि एक आवळा रोज खा. आवळ्याचं लोणचं बनवू शकता.
कोणते आवळे खावेत?
अनेकांना प्रश्न पडतो की, कोणत्या प्रकारचे आवळे खाण्यासाठी अधिक चांगले असतात. बाजारात दोन प्रकारचे आवळे मिळतात एक म्हणजे छोट्या आकाराचे आणि दुसरे मोठ्या आकाराचे. एक्सपर्टनुसार, गावराणी आवळे खावेत जे आकाराने लहान असतात. मोठा आकाराचे आणि स्वच्छ दिसणारे आवळे हायब्रिड असतात. ते खाऊ नये.
आवळा आणि मध खाण्याचे फायदे
- बरेच लोक हिवाळ्यात मध आणि आवळे खातात. यातील अॅंटी-फंगल गुणांमुळे आरोग्यासंबंधी अनेक दूर करण्यास मदत मिळते. सोबतच केसही मजबूत होतात.
- अस्थमाच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात आवळ्याचा समावेश करायला हवा. यातील गुणांमुळे ही समस्या कमी करण्यास मदत मिळते. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात, जे फुप्फुसातील विषारी तत्व बाहेर काढतात.
- तसेच आवळ्यामध्ये असेही काही तत्व असतात जे कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते.
- त्वचेची चमक वाढवण्यासाठी आवळा आणि मधातील गुण मदत करतात. याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाइन लाईन कमी होतात.
मधासोबत कसे खाल?
5 आवळे घेऊन त्यांचे तुकडे करा. आता त्यात एक मोठा चमचा मध टाकून आवळे मुरू द्या. रोज उपाशीपोटी किंवा जेवणाच्या एक तासआधी आवळ्याचे एक दोन तुकडे खा. तुम्ही आवळा आणि मधाचं हे मिश्रण १० ते १५ दिवस स्टोर करून ठेवू शकता.
