Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात दही खाताना ३ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तब्येतीला फायदा होण्याऐवजी आजारीच पडाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2026 11:52 IST

Avoid 3 Mistakes While Eating Curd in Summer: सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे दही खाण्याचं प्रमाण वाढवलं असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा..(correct method of eating curd in summer season)

उन्हाळा सुरू झाला की घराघरांमध्ये दही खाण्याचं प्रमाण वाढतं. जे लोक एरवी दही खात नाहीत, ते लोकही उन्हाळ्यात आठवणीने अगदी दररोज दही खातात. ऑफिसला जाणाऱ्या कित्येक लोकांच्या दुपारच्या जेवणातही दही असतेच. आता दही खाणं हे तब्येतीसाठी चांगलंच आहे. पण जर फक्त शरीराला थंडावा मिळावा म्हणून तुम्ही दही खात असाल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी वाचा आणि दही खाताना काही प्रमुख चुका करणं टाळा (Avoid 3 Mistakes While Eating Curd in Summer). कारण यामुळे तब्येतीला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं.(correct method of eating curd in summer season)

 

उन्हाळ्यात दही खाताना कोणती काळजी घ्यावी?

१. शरीराला थंडावा मिळतो असं वाटून उन्हाळ्यात दही खाण्याचं प्रमाण वाढवू नका. कारण सध्या उन्हाळ्यामुळे कित्येक जण नाश्त्याला दही खातात. शिवाय दुपारी जेवणातही दही घेतात.

वेगन शाई वापरून विराट कोहलीने हातावर काढलं टॅटू, म्हणजे नेमकं काय- कशी तयार करतात वेगन इंक?

असं रोजच खूप जास्त प्रमाणात दही खाणं चांगलं नाही. कारण दही हे आंबट, उष्ण आणि पचायला जड असतं. दही खाल्ल्याने कफ वाढतो. तसेच सर्दी, सायनस असा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे दररोजच खूप जास्त प्रमाणात दही खाणं टाळा.

 

२. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या जेवणात कधीही दही खाऊ नका. रात्री दही खाल्ल्याने शरीरातला कफ वाढतो. दही खायचं असेल तर दुपारची वेळच अगदी योग्य आहे. शिवाय दह्यामध्ये नेहमीच सैंधव मीठ, साधं मीठ किंवा साखर घालून घावी. त्याचे शरीराला जास्त फायदे होतात.

उन्हाळ्यात प्रोटीनचा स्वस्तात मस्त खजिना, 'हे' पदार्थ प्या- प्राेटीन्सची कमतरता चटकन भरून निघेल..

३. विकतचं दही खाणं टाळा. कारण ते कित्येक प्रिझर्व्हेटीव्ह्ज, केमिकल्स वापरून तयार केलेलं असतं. असं दही चवीला नुसतंच गोड असलं तरी ते शरीराला म्हणावे तसे फायदे देत नाही. त्याउलट घरी नैसर्गिक पद्धतीने लावलेलं थोडंसं दही खाल्लं तरी ते पोषक ठरतं. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid these mistakes while eating curd in summer for health benefits.

Web Summary : Eating curd in summer is beneficial, but moderation is key. Avoid excessive daily consumption, as it can increase cough and cold. It's best consumed during the day with salt or sugar. Avoid store-bought curd with preservatives; homemade curd is more nutritious.
टॅग्स :अन्नसमर स्पेशलआरोग्यहेल्थ टिप्स