Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीयेला पाहुण्यांसाठी खास मेन्यू- लग्नात आचारी करतात तसा चमचमीत व्हेज कोरमा! पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2026 09:30 IST

Indian Party Menu Ideas: Best Veg Kurma for Dosa and Paratha: पाहूयात आचारी स्टाईल व्हेज कोरमाची खास रेसिपी आणि काही सोप्या टिप्स.

अक्षय्य तृतीयेचा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी आपल्या घराघरात पाहुण्यांची वर्दळ असते आणि खास बेत आखला जातो. गरमागरम पुरणपोळी किंवा आमरस-पुरीचा बेत तर ठरलेला असतोच, पण त्यासोबत जर लग्नाच्या पंगतीत मिळते अशी चमचमीत व्हेज कोरमा भाजी असेल तर जेवणाची रंगत द्विगुणित होते.(Mixed Vegetable Kurma recipe) अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, आचाऱ्याने बनवलेल्या भाजीला जी चव आणि दाटसरपणा असतो तो घरी का येत नाही? ( Creamy Vegetable Gravy for Chapati)लग्नातील व्हेज कोरमाची चव त्यातील वाटण आणि भाज्यांच्या योग्य शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.(Indian Curry recipe) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाहुण्यांना तृप्त करण्यासाठी हॉटेल किंवा केटरर्सपेक्षाही भारी चवीची भाजी आपण बनवू शकतो. पाहूयात आचारी स्टाईल व्हेज कोरमाची खास रेसिपी आणि काही सोप्या टिप्स. 

२ मिनिटांत तव्यावरचे काळे डाग- चिकटपणा कमी करण्याचा घरगुती उपाय- तवा दिसेल नवाकोरा

साहित्य 

फ्लॉवर - अर्धा कप गाजर - अर्धा कप बटाटा - अर्धा कप फरसबी - अर्धा कपमटार - अर्धा कप बारीक चिरलेला कांदा - १ मध्यम बारीक चिरलेला टोमॅटो - १ मध्यमतूप - २ ते ३ मोठे चमचेतमालपत्र - २ काळीमिरी - ७ ते ८हळद - १/४ छोटा चमचालाल तिखट - १ छोटा चमचागरम मसाला - १ छोटा चमचा मीठ - चवीनुसार कोथिंबीर ओले खोबरे - अर्धा कप काजू - १२ ते १५खसखस - १ मोठा चमचा चणा डाळ - १ छोटा चमचा लसूण पाकळ्या - ५ ते ६ आलं - १ इंच हिरव्या मिरच्या - २ लवंगा - ३ जिरे - १ चमचा दालचिनी - १ तुकडा हिरवी वेलची - २ पनीरचा छोटा तुकडा गरजेनुसार पाणी

कृती 

1. सगळ्यात आधी एका भांड्यात खसखस आणि काजू पाणी घालून अर्धा तास भिजत घाला. नंतर मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे, भिजवलेले साहित्य आणि भाजलेली चणा डाळ घाला. त्यात लसूण, आले, हिरवी मिरची, खडे मसाले, जिरे, पनीरचा तुकडा घालून त्याची पेस्ट तयार करा. 

2. यानंतर कढईमध्ये २ चमचे तूप, काळी मिरी, तमालपत्र आणि कांदा घालून परतवून घ्या. नंतर त्यात टोमॅटो आणि मीठ घालून परतवा. २ ते ३ मिनिटे झाकून ठेवा, आता त्यात हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, तयार पेस्ट घालून ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या. 

3. त्यात वरुन बटाटा, गाजर, फ्लॉवर, फरसबी आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणी कढईमध्ये घाला. वरुन मीठ घालून झाकण ठेवा. भाज्या व्यवस्थित शिजू द्या. नंतर यात उकडलेले वाटाणे आणि कोथिंबीर घालून पुन्हा झाकण झाका. पुरी किंवा पराठ्यासोबत खा आचारी स्टाईल व्हेज कोरमा भाजी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaya Tritiya Special: Chef-style Veg Korma Recipe for Guests

Web Summary : Make restaurant-style Veg Korma at home for Akshaya Tritiya. The recipe involves preparing a special paste with coconut, cashews, and spices. Sauté vegetables in ghee, add the paste, and simmer until cooked. Garnish with coriander and serve hot.
टॅग्स :अन्नपाककृतीअक्षय्य तृतीया