Join us

अस्सल कोकणी नाश्ता करायचा असेल तर हे नारळाच्या दुधातले पोहे खा, जरा हटके पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2025 16:48 IST

authentic Konkani breakfast, try this coconut milk poha, a slightly different dish : नारळाच्या दुधात भिजवून करा असे पोहे. चवीला फारच सुंदर आणि करायला सोपे.

नाश्त्यासाठी पोहे आपण बरेचदा खातो. फोडणीचे पोहे फार लोकप्रिय अशी रेसिपी आहे. तसेच कोकणात कोळाचे पोहे फार आवडीने खाल्ले जातात. जिथे जे पिकते ते खाल्ले जाते. (authentic Konkani breakfast, try this coconut milk poha, a slightly different dish)कोकणात नारळाचे पिक छान येते त्यामुळे भाजी ते आमटी सगळ्यात नारळ असतो. नारळाच्या दुधातले पोहे नाश्त्यासाठी केले जातात. चवीला फार सुंदर लागतात. करायला एकदम सोपे आहेत. पाहा रेसिपी.      

साहित्यजाड पोहे, नारळ, साखर, पाणी, वेलची पूड

कृती१. जाड पोहे छान स्वच्छ धुवायचे. नंतर एका चाळणीवर टाकायचे. पाणी निथळू द्यायचे. पोहे छान सुके करायचे. त्यात सारखा हात फिरवू नका. पोहे तुटतात. 

२. नारळाचे दूध काढून घ्यायचे. त्यासाठी सर्वप्रथम एक नारळ फोडायचा. चांगला ताजा नारळ घ्यायचा. (authentic Konkani breakfast, try this coconut milk poha, a slightly different dish)चव जास्त छाव लागते. नारळ फोडल्यावर छान खवायचा. खवला नाही आणि त्याचे पातळ काप केले तरी चालेल. मात्र काप पातळच करायचे. मिक्सरच्या भांड्यात जेवढा नारळ तेवढेच पाणी घ्यायचे. आणि नारळ व्यवस्थित वाटला जाईल याची काळजी घ्यायची. पाणी व नारळ एकजीव व्हायला हवे. 

३. एका खोलगट पातेल्यावर छान स्वच्छ फडका ठेवायचा. पातळ असा फडकाच घ्यायचा. त्यावर नारळाचे दूध ओतायचे आणि गाळून घ्यायचे. त्यात पुन्हा पाणी घालायचे पुन्हा पिळायचे. चोथा अगदी सुका करुन घ्यायचा. चोथा टाकून द्यायचा आणि नारळाचे दूध तयार होईल. 

४. एका परातीत धुतलेले पोहे घ्यायचे. त्यावर नारळाचे दूध ओतायचे किमान २० मिनिटे तरी पोहे नारळाच्या दुधात भिजू द्यायचे. पोहे छान मुरल्यानंतर त्यात साखर घालायची. वेलची पूड घालायची आणि पोहे कालवायचे. आणखी दहा मिनिटे झाकून ठेवायचे. साखर विरघळू द्यायची. साखर विरघळल्यावर पोहे छान खमंग होतात. साखर फार जास्त घालू नका. नारळाच्या दुधाची चव फार छान लागते.

हा पदार्थ नारळाच्या दुधातच केला जातो असे नाही. साध्या दुधातही पोहे भिजवता येतात. चवीला जरा वेगळे लागतात. सगळ्यांनाच नारळाचे दूध आवडत नाही. ज्यांना   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.