Lokmat Sakhi >Food > आषाढी स्पेशल : उपासाला करा भगर आमटी! मऊमऊ भगर आणि झणझणीत शेंगदाणा आमटी, एकादशीचाच चमचमीत बेत

आषाढी स्पेशल : उपासाला करा भगर आमटी! मऊमऊ भगर आणि झणझणीत शेंगदाणा आमटी, एकादशीचाच चमचमीत बेत

Ashadhi Special: Make Bhagar Amti for fasting! Soft Bhagar and spicy peanut Amti, a sparkling treat for Ekadashi : यंदा उपासाला करा असा मस्त बेत. झटपट करा शेंगदाणा आमटी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2025 16:01 IST2025-07-04T16:00:20+5:302025-07-04T16:01:04+5:30

Ashadhi Special: Make Bhagar Amti for fasting! Soft Bhagar and spicy peanut Amti, a sparkling treat for Ekadashi : यंदा उपासाला करा असा मस्त बेत. झटपट करा शेंगदाणा आमटी.

Ashadhi Special: Make Bhagar Amti for fasting! Soft Bhagar and spicy peanut Amti, a sparkling treat for Ekadashi | आषाढी स्पेशल : उपासाला करा भगर आमटी! मऊमऊ भगर आणि झणझणीत शेंगदाणा आमटी, एकादशीचाच चमचमीत बेत

आषाढी स्पेशल : उपासाला करा भगर आमटी! मऊमऊ भगर आणि झणझणीत शेंगदाणा आमटी, एकादशीचाच चमचमीत बेत

उपासासाठी अनेक पदार्थ केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे शेंगदाणा आमटी. वरी तांदूळाचा भात आणि त्यावर घट्ट गरमागरम शेंगदाणा आमटी हा बेत असेल तर उपास न ठेवणारेही उपास सुरु करतील. (Ashadhi Special: Make Bhagar Amti for fasting! Soft Bhagar and spicy peanut Amti, a sparkling treat for Ekadashi)आषाढीसाठी यंदा अशी आमटी करुन पाहा. करायला फारच सोपी आहे आणि चवीला तर आहाहा एकदम मस्त असते.  

काही जण कोथिंबीर वापरतात. तसेच काही जणे आलंही वापरतात. उपासाला हे पदार्थ काही ठिकाणी खाल्ले जातात तर काही ठिकाणी खात नाहीत. तुम्ही जर खात असाल तर नक्की घाला चव आणखी छान लागेल. कोथिंबीरीशिवायही आमटी मस्तच लागते.  

साहित्य 
शेंगदाणे, नारळ, तूप, हिरवी मिरची, जिरे, मीठ, साखर, पाणी 

कृती
१. छान ताजा नारळ घ्यायचा. फोडायचा आणि खवायचा. काही जण सुकं खोबरंही वापरतात. पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते. मात्र पदार्थ उपासाचा असल्यामुळे साहित्य सारखेच असते. नारळ खवून झाल्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे. मस्त खरपूस भाजायचे. सालं काढली नाही तरी चालेल. दाणे भाजून झाल्यावर जरा गार करुन घ्या. थोडे दाणे परतून झाल्यावर बाजूला ठेवायचे.  

२. एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले दाणे घ्यायचे. त्यात खवलेला नारळ घालायचा. जर दोन वाटी दाणे असतील तर एक वाटी नारळ घ्यायचा. त्यात जिरे घालायचे आणि थोडे पाणी घालून मस्त एकजीव पेस्ट वाटून घ्यायची. सगळे पदार्थ छान वाटले गेले पाहिजेत. 

३. एका कढईत तूप घ्यायचे. काही जण उपासाला तेलही वापरतात. तर काही जण फक्त तूप खातात. जागेनुसार पदार्थ बदलतात. तुपावर चमचाभर जिरे परतायचे. जिरे छान खमंग परतून झाल्यावर त्यात बाजूला काढून ठेवलेले दाणे जरा तुकडे करुन घालायचे. आमटी जास्त छान लागते. दाणे जरा खमंग परतल्यावर त्यात तयार केलेली पेस्ट घालायची.  मस्त परतायची आणि मग त्यात चमचाभर साखर घालायची. तसेच चवी पुरते मीठ घालायचे. सगळं एकजीव करा आणि मग त्यात थोडे पाणी घाला. आमटी जास्त पातळ करायची नाही घट्टच करायची. 

Web Title: Ashadhi Special: Make Bhagar Amti for fasting! Soft Bhagar and spicy peanut Amti, a sparkling treat for Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.