आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi Special) हा महाराष्ट्रात मोठया श्रद्धेने साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण. या दिवशी अनेक भक्त उपवास करून विठुरायाचं दर्शन घेतात. उपवासाच्या दिवशी शक्यतो, थोडं हलकं आणि पोटभरीचा पदार्थ खाणं फायदेशीर ठरतं. उपवास म्हटलं की काही मोजकेच पदार्थ खावे लागतात, त्यामुळे आपण शक्यतो साबुदाण्याची खिचडी(Upvasachi Batata Puri) किंवा वडेच खातो. परंतु नेहमीचे उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन (Vrat ki Puri) काहीवेळा अगदीच कंटाळा येतो. यासाठीच, उपवासाला बटाट्याच्या केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांमधील खास आणि पारंपरिक पदार्थ म्हणजे बटाट्याच्या पुऱ्या(Batata Puri Recipe).
उपवासाची बटाट्याची भाजी आणि गरमागरम बटाट्याच्या खुसखुशीत टम्म फुगलेल्या पुऱ्या, म्हणजे उपवास होईल खास... विठुरायाच्या भक्तीत रंगलेली आषाढी एकादशी आणि उपवासाला तयार केलेली बटाटा पुरी यामुळे उपवासाची चव आणि आनंद दुप्पट होतो. या पुऱ्या ४ ते ५ दिवस चांगल्या टिकतात, त्यामुळे आपण फक्त उपवासालाच नाही तर सकाळच्या नाश्त्याला देखील मनसोक्त खाऊ शकता. यंदाच्या आषाढी एकादशीच्या उपवासाला खुसखुशीत अशा बटाटा पुऱ्यांचा बेत नक्की करून पाहा.
साहित्य :-
१. बटाटे - ३ (उकडलेले)२. वरईच पीठ - २ कप ३. मीठ - चवीनुसार४. जिरे - १ टेबलस्पून ५. चिलीफ्लेक्स - १ टेबलस्पून ६. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ७. साजूक तूप - ३ ते ४८. गरम पाणी - गरजेनुसार
Ashadhi Ekadashi Food : कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे करा झटपट, खास एकादशी स्पेशल पदार्थ...
कृती :-
१. सगळ्यातआधी बटाटे उकडवून त्याची सालं काढून तो संपूर्णपणे मॅश करून घ्यावा किंवा किसणीवर किसून घ्यावा. २. किसून घेतलेला बटाट्याच्या किस एका मोठ्या भांडयात घेऊन त्यात वरईच पीठ, चवीनुसार मीठ, जिरे, चिलीफ्लेक्स, लाल मिरची पावडर, साजूक तूप असे सगळे जिन्नस घालावेत. ३. आता यात गरजेनुसार थोडे - थोडे गरम पाणी ओतून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे.
४. मळून घेतलेल्या पिठाचे गोळे तयार करून घ्यावेत. ५. आता पोळपाटावर एक छोटी प्लॅस्टिकची पिशवी ठेवून त्यावर थोडे तेल पसरवून मग प्रत्येकी एक गोळा ठेवून वरुन परत दुसरी प्लॅस्टिकची पिशवी ठेवून हलकेच हाताने दाब देत पुरी गोलाकार थापून घ्यावी. ६. त्यानंतर कढईत तेल गरम करून, त्यात पुऱ्या सोडून हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्याव्यात.
४ ते ५ दिवस टिकणाऱ्या व टम्म फुगलेल्या उपवासाच्या गरमागरम बटाटा पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. या पुऱ्या आपण दही किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता.