महाराष्ट्र, गुजरात, उत्तर भारत यांसारख्या ठिकाणी एकादशी हा महत्त्वाचा दिवस मानला जातो.(Ashadhi Ekadashi Special) आषाढी एकादशीचा दिवस हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात.(15-minute kheer recipe) या दिवशी अनेक भक्तगण उपवास करतात. विठूरायाचे दर्शन घेतात. उपवासाच्यानिमित्ताने आपण साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा पापड, भगर, पराठा, साबुदाण्याची खीर असे विविध पदार्थ खातो.(Ashadhi Ekadashi special recipe ) साबुदाणा हा पचायला काही प्रमाणात जड असतो.(traditional Indian sweet for fasting) परंतु, जर आपल्याला वेगळ्या पद्धतीची खीर करायची असेल तर आपण राजगिऱ्याची खीर ट्राय करु शकतो. राजगिरा फायबरचा चांगला स्त्रोत आहे. पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतो. यामध्ये कॅल्शियम भरपूर असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ही उपवासाची खीर कशी बनवायची पाहूया.
सकाळच्या घाईत डब्यासाठी काय करायचं? झटपट होणारी मोड आलेली मसूरची उसळ, चमचमीत- झणझणीत रेसिपी
साहित्य
राजगिरा - १ कप तूप - अर्धा चमचागरम पाणी - २ कप दूध - ४ कप ड्रायफ्रुट्स - आवडीनुसार वेलची पूड - चिमूटभर साखर - आवश्यकतेनुसार केशर
कृती
1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये कपभर राजगिरा घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता एका चाळणीमध्ये काढून त्यातील सर्व पाणी काढून घ्या.
2. आता कुकरमध्ये तूप घालून त्यात भिजवलेला राजगिरा घाला.व्यवस्थित परतवून घ्या. यामध्ये वरुन २ कप गरम पाणी घालून चांगले ढवळून घ्या. कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या काढा.
3. कुकर थोडा थंड झाल्यानंतर त्याचे झाकण उघडा. त्यात ४ कप दूध घालून उकळी येऊ द्या. वरुन ड्रायफ्रुट्स , वेलची पूड आणि केशर घाला. खीर दाटसर होण्याआधी आपण आवश्यकतेनुसार साखर घालू शकतो.
4. जर आपल्याला कमी साखरेची किंवा शुगर फ्री खीर हवी असेल तर आपण त्याची साखरही वापरु शकतो. ही साखर वापरताना खीर सर्व्ह करण्यावेळी घालावी. चवीला एकदम मस्त आणि पौष्टिक उपवासाची खीर तयार होईल.