आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi Food) आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. आपल्यापैकी बरेचजण आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करतात. खरंतर, उपवास म्हटलं की उपवासाचे वेगवेगळे पदार्थ (Ashadhi Ekadashi Food) खाण्याची मज्जा काही औरच असते. उपवासाच्या दिवशी आपण काही मोजकेच पदार्थ खातो, त्यामुळे घरोघरी ( Upvasache Appe) उपवासाच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. उपवासाचे कोणतेही पदार्थ करताना त्यात हमखास साबुदाणा, भगर, बटाटा अशा पदार्थांचा (Special Fasting Recipe) वापर केला जातो. याच नेहमीच्या पदार्थांचा वापर करून आपण काही हटके आणि चविष्ट (How To Make Fasting Appe) पदार्थ तयार करु शकतो. असाच एक झटपट आणि चवदार पदार्थ म्हणजे ( Farali Appe Recipe) उपवासाचे आप्पे! हे आप्पे तयार करायला अगदी सोपे असून, अगदी झटपट तयार होतात.
कुरकुरीत आणि स्वादिष्ट आप्प्यांमुळे भूक चटकन भागते आणि ऊर्जा मिळते. हे आप्पे चविष्ट असण्यासोबतच हलके आणि पोटभरीचेही असतात. साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, भगर यांसारख्या उपवासाला चालतील अशा पदार्थांपासून तयार केलेले आप्पे पौष्टिक आणि पचनासही हलके असतात. उपवासाच्या दिवसात नुसतीच खिचडी, वडे, फळं खाण्याऐवजी या छान, कुरकुरीत आप्प्यांचा आस्वाद घेऊन उपवासाचा घ्या आनंद...
साहित्य :-
१. भगर - १ कप २. साबुदाणा - १/२ कप ३. दही - १ कप ४. पाणी - १ कप ५. मीठ - चवीनुसार६. जिरे - १ टेबलस्पून ७. शेंगदाण्याचा कूट - २ टेबलस्पून ८. हिरव्या मिरच्या - २ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)९. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली) १० बटाट्याचा किस - १/२ कप (कच्चा बटाटा किसलेला)११. खायचा सोडा - चिमूटभर१२. साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून
पावसाळ्यात डाळी - कडधान्य खराब होतात? डब्यात ठेवा ७ पदार्थ- अळ्या-किडे-बुरशीचा त्रास नाही...
कृती :-
१. सगळ्यांतआधी एका पॅनमध्ये भगर आणि साबुदाणे एकत्रित करून हलकेच कोरडे भाजून घ्यावेत. भाजून घेतल्यानंतर ते मिश्रण थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात ओतून त्याची थोडी जाडसर आधी भरड तयार करुन घ्यावी. २. मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या पिठात दही आणि गरजेनुसार थोडे पाणी घालून पुन्हा एकदा मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. आता तयार बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. हे बॅटर १० ते १५ मिनिटे झाकून ठेवून द्यावे.
३. १५ मिनिटांनंतर हे बॅटर चमच्याने हलवून घ्यावे. मग या बॅटरमध्ये, चवीनुसार मीठ, जिरे, शेंगदाण्याचा कूट बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, कच्च्या बटाट्याचा किस आणि चिमूटभर सोडा घालावा. ४. आता आप्पेपात्र व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात साजूक तूप सोडून मग आप्प्याचे बॅटर चमच्याने घालावे. त्यानंतर वरुन झाकण ठेवून ५ ते १० मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यावे. दोन्ही बाजुंनी खरपूस असा हलका ब्राऊन रंग येईपर्यंत आप्पे व्यवस्थित शिजवून घ्यावे.
उपवासाचे आतून मऊ, बाहेरून कुरकुरीत असे गरमागरम आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. गरमागरम आप्पे चटणीसोबत खायला अधिकच चविष्ट लागतात.