आषाढी एकादशीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Ashadhi Ekadashi special recipe) अनेक वारकरी या दिवशी विठूरायाचे दर्शन घेतात. या दिवशी मोठ्या भक्ती भावाने उपवास केला जातो. (vrat patties recipe for fasting) उपवास म्हटलं की, आपल्याकडे अनेक खमंग पदार्थांची रेलचेल असते. उपवासाच्या दिवशी काय खावे असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. (healthy Ekadashi snacks)
साबुदाणा खिचडी, वडे, राजगिरा थालीपीठ, भगर, शिंगाड्याचा पराठा, खीर यांसारखे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. (upvas recipe ideas) अशावेळी गृहिणींसाठी सगळ्यात मोठे आव्हानच असते की, उपवासाच्या दिवशी काय बनवायला हवे. उपवासाचे पदार्थ खाता यावे यासाठी अनेक जण उपवास करतात. (soft vrat patties recipe) परंतु काही आगळवेगळ खायचे असेल तर आपण उपवासाचे पॅटीस करु शकतो. (nutritious fasting recipes India) खायला अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत पदार्थ आहे. ही रेसिपी नेमकी करायची कशी याची सोपी रेसिपी पाहूया. (easy upvas patties)
एक कण साखर न घालता करा पिकलेल्या केळीचा ‘खास’ गोड पदार्थ, प्रोटीन भरपूर
साहित्य
बटाटे - ३
शेंगदाण्याचा कूट - १ वाटी
खोबऱ्याचा किस - १ वाटी
किशमिश - १० ते १२
हिरवी मिरची - २ ते ३
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
जीरेपूड - २ चमचा
मीठ - चवीनुसार
लिंबाचा रस
साखर - चवीनुसार
साबुदाणा - १/२ कप
तळण्याकरिता तेल
कृती
1. सगळ्यात आधी बटाटे धुवून कुकरमध्ये पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर एका भांड्यामध्ये दाण्याचा कूट, खोबऱ्याचा किस, किशमिश, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा जिरेपूड, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करा.
2. जर आपण उपवासात वरीलपैकी कोणतेही पदार्थ खात नसू तर ते वगळू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्या.
3. मिक्सरमध्ये वाटलेला साबुदाण्याला चाळून घ्या. त्याची बारीक आणि जाड अशी दोन्ही प्रकारे पिठी तयार होईल. आता कुकरमधील बटाटे थंड झाले असतील तर त्याची साले काढून हाताने मॅश करा.
4. बटाटे मॅश केल्यानंतर त्यात तांदाळाची जाड पिठी घालून त्यात मीठ, जिरेपूड, हिरवी मिरची घालून त्याचे पीठ मळा. आता तयार पीठाचा गोळा घेऊन त्यात सारण भरा. गोळा बंद करुन त्याला साबुदाण्याची बारीक केलेल्या पिठीमध्ये घोळवून घ्या.
5. गॅसवर तेल गरम करा. तयार पॅटीस मंद आचेवर तळून घ्या. हिरव्या चटणी किंवा दह्यासोबत खा गरमागरम मऊ उपवासाचे पॅटीस.