Join us  

तांदूळ न भिजवता-न वाटता करा अण्णा इडली; मऊ, स्पंजी, फुलणाऱ्या इडलीची खास रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 1:57 PM

Anna Idli Recipe (Anna Idali Kashi Kartat) : इडल्या करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळेत या इडल्या बनून तयार होतील.

सकाळच्या नाश्त्याला (Breakfast) किंवा दुपारच्या जेवणासाठी इडली खायला सर्वांनाच आवडते. इडली खायला जितकी सॉफ्ट, मऊ लुसलुशीत लागते तितकीच ही इडली करणं सोपं आहे. (Idli Making Tips) दक्षिण भारतात इडल्याचे बरेच प्रकार प्रचलित आहेत. नेहमी नेहमी त्याच टाईपच्या इडल्या खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने काही इडल्या ट्राय करू शकता. (Anna Idli Recipe) इडल्या करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळेत या इडल्या बनून तयार होतील. (How To Make Idli At  Home)

 अण्णा इडली करण्याची सोपी पद्धत (How To Make Anna Idli) 

1) अण्णा इडली करण्यासााठी उडीदाची  डाळ एक कप घ्या, हाताने चोळून व्यवस्थित डाळ धुवून घ्या.  २ ते ३ वेळा पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्या.  डाळीत अर्धा चमचा  मेथी घाला. ३ ते ४ तास डाळ भिजवल्यानंतर त्यातलं पाणी उपसून घ्या. यातलं सर्व पाणी काढून घेऊन संपूर्ण डाळ एका मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्या. यात थोडं पाणी घालून बारीक करून घ्या.

पोट मांड्या सुटल्या-फिगर जाड दिसते? रोज लो कॅलरी ५ पदार्थ खा, झरझर वजन कमी होईल

२) डाळ बारीक दळली जात नसेल तर पुन्हा पाणी घालून दळून घ्या. एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. डाळीच्या मिश्रणात एक वाटी इडलीचा रवा घाला. ३ कप रवा घ्या.  २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.  धुतलेला रवा डाळीत घालून चांगले एकजीव करून घ्या.

३) हे बॅटर एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. ही इडली बनवण्यासाठी तुम्हाला इडली मेकरची आवश्यकता असेल. हे इडली मेकर बाजारात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध होईल. रवा आणि डाळीचं फुललेलं मिश्रण  एका भांड्यात काढून घ्या. 

पीठ न मळता न लाटता मऊ चपात्या करण्याची सोपी ट्रिक; पाहा व्हिडिओ-पटकन फुगतील चपात्या

४) ६ तासात हे बॅटर अगदी व्यवस्थित फरमेंट होईल. इडलीच्या भांड्याला  व्यवस्थित तेल लावून घ्या. तेलाने ग्रीस करून घ्या. त्याच प्रमाणात इडलीचे बॅटर घाला. १० ते १५ मिनिटांसाठी इडली वाफवून घ्या. तयार आहे गरमागरम इडली. ही इडली सांबार, खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर तुम्ही आवडीने  खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स