Lokmat Sakhi >Food > अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी- चाखून बघताच म्हणाल बल्ले बल्ले! फक्त १५ मिनिटांत होणारी खास रेसिपी 

अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी- चाखून बघताच म्हणाल बल्ले बल्ले! फक्त १५ मिनिटांत होणारी खास रेसिपी 

Amritsar Special Paneer Bhurji: कधी घरात कोणतीच भाजी नसेल तर ही अमृतसर स्टाईलची पनीर भुर्जी एकदा नक्की ट्राय करून पाहा..(how to make paneer bhurji?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2025 17:14 IST2025-09-03T17:13:18+5:302025-09-03T17:14:15+5:30

Amritsar Special Paneer Bhurji: कधी घरात कोणतीच भाजी नसेल तर ही अमृतसर स्टाईलची पनीर भुर्जी एकदा नक्की ट्राय करून पाहा..(how to make paneer bhurji?)

Amritsar special paneer bhurji, how to make paneer bhurji, simple and easy recipe of paneer bhurji  | अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी- चाखून बघताच म्हणाल बल्ले बल्ले! फक्त १५ मिनिटांत होणारी खास रेसिपी 

अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी- चाखून बघताच म्हणाल बल्ले बल्ले! फक्त १५ मिनिटांत होणारी खास रेसिपी 

Highlightsआपण करतो ती पनीर भुर्जी आणि अमृतसरी स्टाईलची पनीर भुर्जी यात नेमका काय फरक?

अमृतसरमध्ये पनीर भुर्जी हे स्ट्रीटफूड अतिशय प्रसिद्ध असून तिथे ते पावसोबत खाल्लं जातं. पावसोबत नसेल खायचं तर आपण ते चपाती किंवा पोळीसोबत नक्कीच ट्राय करून पाहू शकतो. शिवाय पनीर भुर्जी करायला खूप वेगवेगळ्या पदार्थांचीही गरज नाही. अगदी मोजक्या साहित्यात आणि खूपच कमी वेळेत अतिशय चवदार पनीर भुर्जी तयार करता येते (Amritsar Special Paneer Bhurji). आपण करतो ती पनीर भुर्जी आणि अमृतसरी स्टाईलची पनीर भुर्जी यात नेमका काय फरक आहे (how to make paneer bhurji?) हे सांगणारी एक खास रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे.(simple and easy recipe of paneer bhurji)

अमृतसर स्टाईल पनीर भुर्जी करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ चमचे तेल

२ चमचे बेसन

२ चमचे बटर

२ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आणि टोमॅटो

ऐश्वर्या नारकर सांगतात तोंडल्याच्या भाजीची पारंपरिक रेसिपी- एकदा चाखून पाहाल तर नेहमीच करून खाल

२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि २ टीस्पून आलं- लसूण पेस्ट

अर्धा टीस्पून हळद

चवीनुसार लाल तिखट आणि मीठ

धने पावडर, जिरे पावडर प्रत्येकी अर्धा चमचा

पनीर २०० ग्रॅम

थोडी कोथिंबीर आणि थोडी कसूरी मेथी.

 

कृती 

सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घाला आणि त्यात बेसन घालून मंद आचेवर चांगलं भाजून घ्या. 

यानंतर दुसरी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. ती गरम झाल्यानंतर त्यात बटर घाला आणि बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, आलं, लसूण घालून परतून घ्या. कांदा खूप जास्त परतून घेऊ नये.

ओणम २०२५: सणाचा आनंद वाढविणारे खास केरळी पदार्थ- करायला सोपे आणि चवीला अफलातून..

कांदा परतून झाल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, धने आणि जिरे पावडर घाला. यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ घालून ते पुन्हा एकदा परतून घ्या.

यानंतर आता कढईमध्ये भाजून घेतलेलं बेसन घाला. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यात थोडं पाणी घाला आणि सगळ्यात शेवटी त्यात किसून घेतलेलं पनीर घाला. हे मिश्रण खूप जास्त शिजवू नये. थोडी वाफ आली की गॅस बंद करा. त्यात कोथिंबीर आणि कसूरी मेथी घातली की पनीर भुर्जी तयार.. 


 

 

Web Title: Amritsar special paneer bhurji, how to make paneer bhurji, simple and easy recipe of paneer bhurji 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.