सध्या थंडीच्या दिवसांत बाजारांत फार मोठ्या प्रमाणावर हिरवागार आवळा विकायला येतो. आवळा अधिकाधिक पौष्टिक असल्याने शिवाय या दिवसांतच तो मिळत असल्याने आवर्जून आवळा खाल्ला जातोच. काही घरांमध्ये तर चक्क या हिरव्यागार आवळ्याचे अनेक चटपटीत, मसालेदार पदार्थ तयार केले जातात. आवळ्याचे (Amla Pickle Recipe) असे वर्षभर टिकणारे विविध चवीचे पदार्थ खाणे( How To Make Amla Pickle At Home) म्हणजे खवय्यांची चांगली चंगळच (Gooseberry Pickle) असते. आवळ्याचं लोणचं, मुरांबा, कॅण्डी असे पदार्थ घरोघरी गृहिणी अगदी हौसेने करून ठेवतात.
आवळ्याचं आंबट, गोड, तुरट चवीचं लोणचं जेवणात असलं की जेवणाची रंगत खरोखरच आणखी वाढते. जेवणाच्या पानात लोणचं असेल तर आवडीने दोन घास जास्तच जातात. त्यातही जर आंबटगोड चवीचं आवळ्याचं लोणचं (Amla Ka Achar) असेल तर मग विचारूच नका, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारे असे हे हिरव्यागार आवळ्याचे वर्षभर टिकणारे लोणचं कसं तयार करायचं, त्याची रेसिपी पाहूयात. या लोणच्याची चव खरोखरच लाजवाब असते. एकदा जर तुम्ही या लोणच्याची चव घेऊन पाहिली, तर दरवर्षी अगदी आवर्जून हे आवळ्याचं लोणचं घालाल...
साहित्य :-
१. आवळा - ४५० ग्रॅम आवळे २. धणे - २ टेबलस्पून३. बडीशेप - ४ टेबलस्पून ४. जिरे - १ टेबलस्पून ५. पिवळी किंवा काळी मोहरी - २ टेबलस्पून ६. मेथी दाणे - १/२ टेबलस्पून ७. कलोंजी - १ टेबलस्पून८. ओवा - १ टेबलस्पून ९. तेल / मोहरीचे तेल - ५ ते ६ टेबलस्पून १०. हिंग पावडर - १ टेबलस्पून ११. हळद - १ + १/२ टेबलस्पून १२. काश्मिरी लाल मिरची पावडर - ३ ते ४ टेबलस्पून १३. मीठ - २ + १/२ टेबलस्पून १४. लिंबाचा रस / व्हिनेगर - २ टेबलस्पून
नेहमीचाच रवा डोसा होईल अजून क्रिस्पी - कुरकुरीत, ५ टिप्स - डोसा होईल परफेक्ट जाळीदार...
हिवाळ्यात सर्दी-खोकला होऊ नये म्हणून, अभिनेत्री नयनताराच्या आजीची पारंपरिक रेसिपी करून तर पाहा...
कृती :-
१. आवळे स्वच्छ धुवून कापडाने पुसून संपूर्णपणे कोरडे करून घ्यावेत. असे कोरडे आवळे एका भांड्यात ठेवून फक्त पाण्याच्या वाफेवर ४ ते ५ मिनिटे हलकेच वाफवून घ्यावे. २. आवळे व्यवस्थित वाफवून झाल्यावर ते हाताने फोडून त्यातील बिया काढून त्याच्या लहान लहान फोडी करून घ्याव्यात. ३. त्यानंतर आवळ्याच्या लहान फोडी कापडावर पसरवून संपूर्णपणे कोरड्या होईपर्यंत व्यवस्थित वाळवून घ्याव्यात.
४. आता एका पॅनमध्ये धणे, बडीशेप, जिरे, मोहरी, मेथी दाणे एकत्रित घेऊन हलकेच कोरडे भाजून घ्यावेत. हे सगळे जिन्नस कोरडे भाजून घेतल्यानंतर थोडे थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर सगळे जिन्नस मिक्सरच्या भांडयात घालूंन त्याची बारीक पूड होईपर्यंत वाटून घेऊन लोणच्याचा मसाला तयार करून घ्यावा. ५. त्यानंतर त्याच पॅनमध्ये कलोंजी आणि ओवा घेऊन हलकेच कोरडे भाजून घ्यावे. ६. आता पॅनमध्ये तेल घेऊन ते दूर येईपर्यंत थोडे गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करावा. गॅस बंद करून तेल थोडे थंड होऊ द्यावे. ७. तेल थोडे कोमट झाल्यावर त्यात सर्वात आधी हिंग, हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर घालून सगळे जिन्नस चमच्याने हलवून घ्यावे. आता त्यात मिक्सरमध्ये वाटून तयार केलेला लोणच्याचा मसाला आणि भाजून घेतलेले कलोंजी व ओवा घालावा. याचबरोबर चवीनुसार मीठ देखील घालावे. (गॅस बंद करून कोमट तेलात हे सगळे मसाले घालावेत.) ८. सगळ्यांत शेवटी या तयार मिश्रणात वाळवून घेतलेल्या आवळ्याच्या लहान लहान फोडी घालाव्यात. त्यानंतर त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर या दोघांपैकी एक घालावे. आता सगळे जिन्नस एकजीव होण्यासाठी चमच्याने लोणचं हलवून घ्यावे.
आवळ्याचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे, हे तयार लोणचं एक काचेच्या बरणीत भरून स्टोअर करावे. आपण हे लोणचं फ्रिजमध्ये किंवा बाहेर देखील आहे तसेच स्टोअर करून ठेवू शकता.