Lokmat Sakhi >Food > आवळा की संत्र... लवकर वजन कमी करण्यासाठी काय ठरतं सर्वात जास्त फायदेशीर?

आवळा की संत्र... लवकर वजन कमी करण्यासाठी काय ठरतं सर्वात जास्त फायदेशीर?

फळांमध्ये आवळा आणि संत्र हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण वजन कमी करण्याच्या बाबतीत कोणतं फळ जास्त प्रभावी आहे? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:25 IST2025-01-28T19:24:27+5:302025-01-28T19:25:04+5:30

फळांमध्ये आवळा आणि संत्र हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण वजन कमी करण्याच्या बाबतीत कोणतं फळ जास्त प्रभावी आहे? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.

amla or orange which is better for weight loss know the expert opinion | आवळा की संत्र... लवकर वजन कमी करण्यासाठी काय ठरतं सर्वात जास्त फायदेशीर?

आवळा की संत्र... लवकर वजन कमी करण्यासाठी काय ठरतं सर्वात जास्त फायदेशीर?

वजन कमी करण्यासाठी योग्य आहार निवडणं खूप महत्त्वाचं आहे. फळांमध्ये आवळा आणि संत्र हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. पण वजन कमी करण्याच्या बाबतीत कोणतं फळ जास्त प्रभावी आहे? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. दोन्ही फळांचे गुणधर्म आणि फायदे तज्ज्ञांनी सांगितले आहेत. 

आवळा

आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे मेटाबॉलिज्म वेगाने करण्यास मदत करतं, ज्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होण्यास मदत होते. आवळ्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचन सुधारतं आणि पोट बराच काळ भरलेलं ठेवण्यास मदत करतं.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आवळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते, जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय, सकाळी उपाशी पोटी आवळ्याचा रस घेतल्याने वजन कमी होण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.

संत्र

संत्र हे कमी कॅलरीज असलेलं फळ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच, ते रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतं. संत्र्यामध्ये असलेली नॅचरल शुगर वजन कमी करण्यास मदत करते आणि अनावश्यक भूक नियंत्रित होण्यास मदत होते.

संत्री फायबरचा चांगला सोर्स आहे, जो पचनसंस्था निरोगी ठेवतो. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीरातील फॅट्स कमी करण्यास मदत करतात.

आवळा की संत्रा... काय जास्त चांगलं?

तज्ञांच्या मते, दोन्ही फळांचे खूप  फायदे आहेत. जर तुम्हाला वजन कमी करण्यासोबतच डिटॉक्सिफिकेशन हवं असेल तर आवळा हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्याच वेळी, जर तुम्हाला हलकं आणि ताजेतवानं राहायचं असेल तर संत्र खाऊ शकता.
 

Web Title: amla or orange which is better for weight loss know the expert opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.