Lokmat Sakhi >Food > क्षिती जोगला फार आवडते आजीच्या हातचे आंबट वरण! पाहा आंबट वरणाची पारंपरिक रेसिपी...

क्षिती जोगला फार आवडते आजीच्या हातचे आंबट वरण! पाहा आंबट वरणाची पारंपरिक रेसिपी...

Ambat God Varan Recipe : How To Make Ambat Varan At Home : Ambat Varan - Sweet and Sour Dal : चिंचेचा कोळ घातलेले हे आंबट - गोड चवीचे करायला सोपे आणि खायला अतिशय चविष्ट असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2025 17:43 IST2025-01-18T17:38:39+5:302025-01-18T17:43:04+5:30

Ambat God Varan Recipe : How To Make Ambat Varan At Home : Ambat Varan - Sweet and Sour Dal : चिंचेचा कोळ घातलेले हे आंबट - गोड चवीचे करायला सोपे आणि खायला अतिशय चविष्ट असते.

Ambat God Varan Recipe How To Make Ambat Varan At Home Sweet and Sour Dal | क्षिती जोगला फार आवडते आजीच्या हातचे आंबट वरण! पाहा आंबट वरणाची पारंपरिक रेसिपी...

क्षिती जोगला फार आवडते आजीच्या हातचे आंबट वरण! पाहा आंबट वरणाची पारंपरिक रेसिपी...

भारतीय जेवणाची थाळी म्हटलं की त्यात चपाती, भाजी भात, डाळ असे सगळेच पदार्थ येतात. रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आणि चवींच्या डाळी तर खातोच. रोजच्या जेवणात (Ambat God Varan Recipe) नेहमी त्याच त्या डाळी खाऊन कंटाळा आला की आपण काहीतरी वेगळं नक्की करुन पाहतो. अशावेळी (How To Make Ambat Varan At Home) आपण वरण, टोमॅटोचे सार, आमटी असे अनेक प्रकार करतो. गरमागरम वरण आणि भात त्यावर साजूक तुपाची धार तोंडी लावायला चटणी किंवा लोणचं, यासारखं दुसरं सुख जगात नाही(Sweet and Sour Dal).

प्रत्येक भारतीय घरात भातासोबत हमखास वरण देखील केले जाते. बऱ्याचजणांना जेवणात बाकी काही नसेल तरी चालते परंतु वरण - भात हा लागतोच. या वरणात देखील घरोघरी अनेक प्रकारचे वरण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. फोडणीचे, साधे, वाटपाचे वरण असे अनेक प्रकार असतात. वरणाच्या अनेक प्रकारांपैकी सर्वात लोकप्रिय असलेला एक प्रकार म्हणजे (Ambat Varan) आंबट वरण. चिंचेचा कोळ घातलेले हे आंबट - गोड चवीचे करायला सोपे आणि खायला अतिशय चविष्ट असते. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog) हिने व्हायफळ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिला तिच्या आजीच्या हातचे आंबट वरण खूप आवडत, अशी आठवण शेअर केली होती. यानिमित्ताने, आंबट वरण तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.      

साहित्य :- 

१. तेल - २ टेबलस्पून 
२. जिरे - १/२ टेबलस्पून 
३. मोहरी - १/२ टेबलस्पून 
४. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली) 
५. लसूण - ५ ते ६ पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
६. कडीपत्ता - ४ ते ५ पान 
७. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
८. गूळ - १ टेबलस्पून
९. कांदा - ३ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
१०. हिंग - चिमूटभर 
११. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून 
१२. हळद - १/२ टेबलस्पून 
१३. तूर डाळ - १ कप 
१४. जिरे पावडर - १/२ टेबलस्पून 
१५. गरम मसाला - १/२ टेबलस्पून 
१६. साजूक तूप - १ टेबलस्पून 
१७. चिंचेचा कोळ - २ ते ३ टेबलस्पून  
१८. मीठ - चवीनुसार 
१९. पिवळी मूग डाळ - २ टेबलस्पून  

पारंपरिक हुरडा थालीपीठ आवडतं, ‘असं’ हुरडा धिरडंही करुन पाहा, पोटभर-पौष्टिक खाण्याचं सुख...


चांगल्या क्वालिटीचा गूळ विकत घेण्यासाठी पंकज भदौरिया सांगतात ३ टिप्स, निवडा योग्य गूळ...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका कुकरमध्ये पिवळी मूग डाळ आणि तूर डाळ एकत्रित शिजवून घ्यावे. 
२. आता एका भांड्यात थोडेसे तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कडीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेला गूळ घालावा. 

३. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, हिंग, लाल तिखट मसाला, हळद, चिंचेचा कोळ घालावा. 
४. सगळ्यात शेवटी यात शिजवून घेतलेली पिवळी मूग डाळ आणि तूर डाळ घालावी. 
५. आता ही डाळ चमच्याने हलवून व्यवस्थित सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यावे. आता त्यात जिरे पावडर, गरम मसाला, साजूक तूप, चिंचेचा कोळ व चवीनुसार मीठ घालावे. आता भांड्यावर झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यावी. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी.  

आंबट वरण खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम आंबट वरण आपण चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता.

Web Title: Ambat God Varan Recipe How To Make Ambat Varan At Home Sweet and Sour Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.