इन्स्टंट नूडल्स हा कित्येक लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. लहान मुलांनाच नूडल्स आवडतात असं मुळीच नाही. मुलांसोबत त्यांचे पालकही गरमागरम नूडल्स छान एन्जॉय करतात. कुडकुडणाऱ्या थंडीत, रिमझिम बरसणाऱ्या पावसात गरमागरम वाफाळणाऱ्या नूडल्स खाण्याची मजा तर काही वेगळीच असते. तुम्ही जर खरोखरच नूडल्स लव्हर असाल तर ही एक भन्नाट रेसिपी ट्राय करून पाहा (instant noodles recipe in Punjabi style). नेहमीच्या नूडल्सपेक्षा या नूडल्स नक्की अधिक चवदार होतील.(how to make instant noodles more delicious?)
इन्स्टंट नूडल्स करण्याची रेसिपी
साहित्य
इन्स्टंट नूडल्सचे दोन पाकीट १ चमचा लसूण आणि मिरचीची पेस्ट
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
किचनमधले ५ पदार्थ चेहऱ्याला लावा, महागडी बोटॉक्स ट्रिटमेंट केल्यासारखी चमक येईल चेहऱ्यावर
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो
पाव वाटी मटार
१ बारीक चिरलेली सिमला मिरची आणि बारीक चिरलेले गाजर
१ चमचा बटर आणि अर्धा चमचा तेल
दोन वाळलेल्या लाल मिरच्या
एक टीस्पून काश्मिरी लाल तिखट
कृती
गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात बटर आणि तेल घाला.
कुंडीतली घट्ट झालेली माती बदलायला वेळ नाही? घ्या उपाय, माती होईल भुसभुशीत- रोपही छान वाढतील
सगळ्यात आधी मिरची आणि लसूण परतून घ्या. त्यानंतर सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या घालून परतून घ्या.
भाज्या हलक्या परतून झाल्या की त्यामध्ये पाणी, थोडं लाल तिखट, नूडल्स मसाला आणि नूडल्सही घाला. यानंतर कढईवर झाकण ठेवून नूडल्स शिजू द्या.
यानंतर एक छोटी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्या कढईमध्ये थोडं बटर आणि थोडं तेल घाला. ते गरम झाल्यानंतर थोडं काश्मिरी लाल तिखट आणि वाळलेल्या लाल मिरच्या घाला.
जावई माझा भला! विराट कोहली म्हणतो, अनुष्काच्या आईबाबांनीही मला समजून घेतलंच ना, कारण..
आता ही फोडणी शिजवलेल्या नूडल्सवर घाला. सगळ्या नूडल्स एकदा व्यवस्थित हलवून घ्या. या नूडल्स नेहमीपेक्षा जास्त चटपटीत, चवदार लागतील.