Join us
Daily Top 2Weekly Top 5

चांगले दिसतं नसले तरी थंडीत खूप गुणकारी ठरतात शिंगाडे, फायदे वाचाल तर रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:11 IST

Water Chestnut Benefits : शिंगाड्यामध्ये व्हिटामिन सी, मॅगनीज, प्रोटीन, थायमाइन आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. अशात यापासून काय काय फायदे मिळतात हे आज आपण पाहणार आहोत.

Water Chestnut Benefits : हिवाळ्याला सुरूवात झाली की, बाजारात वेगवेगळी फळं दिसू लागतात. ज्यांचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण फळांमध्ये एक असं फळ असतं जे जरा दिसायला बरं नसलं तरी त्याचे फायदे मात्र भरपूर असतात. ते फळ म्हणजे शिंगाडे. वरून काळं कवच आणि आतून पांढरा गर असलेलं हे फळ काही लोक खूप आवडीनं खातात. काही लोक शिंगाडे कच्चे खातात, कुणी उकडून खाता तर कुणी शिंगाड्याच्या पिठाचा वापर करतात. पण बऱ्याच लोकांना याचे फायदे माहीत नसतात. या फळामध्ये व्हिटामिन सी, मॅगनीज, प्रोटीन, थायमाइन आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. अशात यापासून काय काय फायदे मिळतात हे आज आपण पाहणार आहोत.

१) थायरॉईडमध्ये फायदेशीर

शिंगाड्यामध्ये आयोडिन आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असतं. हे तत्व थायरॉईडच्या समस्येमध्ये खूप फायदेशीर ठरतात. यातील आयोडिनने घशासंबंधी समस्यांपासून बचाव होतो. जर तुम्हाला थायरॉईड असेल तर तुमच्यासाठी शिंगाडे फायदेशीर ठरतात. 

२) पोटाच्या समस्येत फायदेशीर

पोटाची समस्या दूर करण्यात शिंगाडे फायदेशीर ठरतात. एक्सपर्टनुसार, शिंगाड्याचं पीठ आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतं. याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते.

३) डिहायड्रेशन दूर होतं

शिंगाड्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत मिळते. जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पित असाल, डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. अशात तुम्ही या फळाचं सेवन करून शरीरात पाणी नियंत्रित ठेवू शकता. 

४) हाडे आणि दातांसाठी फायदेशीर

शिंगाड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आढळतं. जर तुम्ही शिंगाडे नियमितपणे खाल्ले तर हाडे आणि दातही मजबूत होतात.

५) केसांसाठी फायदेशीर

शिंगाडे केसांसाठीही फायदेशीर असतात. हे फळ केसांची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. यातील लॉरिक अ‍ॅसिड केसांना मजबूत करण्यास मदत करतं.

६) सर्दी-खोकला

खोकला शांत करण्यासाठी शिंगाडा प्रभावी ठरतो. शिंगाडे बारीक करून चूर्ण बनवून रस, चहा किंवा पाण्यासोबत घेतल्यास खोकला दूर होतो. शिंगाड्यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट घशाच्या समस्यांमध्ये आराम देण्याचं काम करतात. सोबतच याच्या चहाने कफ कमी होण्यासही मदत मिळते.

७) शरीरात रक्त वाढतं

शिंगाडे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरत दूर होते. त्याचबरोबर पोटाच्या समस्यांवरही फायदेशीर ठरतं. शिंगाडा शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शिंगाडे खावेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Water Chestnuts: Ugly but Healthy Winter Superfood, Read the Benefits!

Web Summary : Water chestnuts, though unappealing in appearance, offer numerous health benefits. Rich in vitamins, minerals, and antioxidants, they aid thyroid function, digestion, hydration, bone strength, hair health, and relieve coughs. They also boost blood levels and provide energy.
टॅग्स :अन्नआरोग्यथंडीत त्वचेची काळजी