Join us
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत दुधाचा चहा विसरा, रोज प्या ओव्याच्या पानांचा चहा, पाहा कधी प्यावा आणि कसा कराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:43 IST

Benefits Of Carom Seeds and Leaves Tea : ओव्याच्या चहामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटामिन भरपूर आढळतात. चला पाहुयात या चहाचे फायदे...

Benefits Of Carom Seeds and Leaves Tea : सामान्यपणे भारतीय घरांमध्ये सकाळी दुधाचा चहा पिण्याची पद्धत आहे. मात्र, एक्सपर्ट सांगतात की, दुधाचा चहा आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. अशात बरेच लोक काळा चहा पितात. पण आम्ही तुम्हाला एका खास चहाबाबत सांगणार आहोत. जो खासकरून हिवाळ्यात आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हा खास म्हणजे ओव्याचा चहा. ओव्याच्या चहामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटामिन भरपूर आढळतात. चला पाहुयात या चहाचे फायदे...डाएटिशियन श्रेया गोयल यांच्या मते, ओव्याच्या पानांचा चहा पिण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

ओव्याचा चहा कधी पावा?

ओव्याच्या पानांचा चहा सकाळी उपाशीपोटी प्यावा. यानं पोट साफ राहतं. शरीरातील जळजळ कमी होते. तसेच पचनशक्ती सुद्धा सुधारते. ओव्याच्या पानांचा चहा रात्रीच्या जेवणानंतरही पिऊ शकता. असं केल्यास गॅस, अपच, पोटदुखी आणि पोट भारी वाटणं कमी होतं. डोकेदुखी किंवा माइग्रेन झाल्यावर ओव्याचा चहा पिऊ शकता. गरमागरम ओव्याचा चहा प्यायल्याने लगेच आराम मिळतो.

ओव्याच्या पानांचा चहा पिण्याचे फायदे

1) माइग्रेन व डोकेदुखीत आराम

ओवा आणि आलं हे दोन्ही नैसर्गिक वेदनाशामक आहेत. त्यांचा चहा माइग्रेनमध्ये लगेच आराम देतो.

2) तणाव कमी करतो

या चहाचा उष्ण गुणधर्म मेंदू शांत करतो. स्ट्रेस आणि मानसिक तणाव कमी होतो.

3) किडनीसाठी फायदेशीर

ओव्याच्या पानांचे गुणधर्म किडनी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात आणि किडनी स्टोनमधील त्रासातही थोडी मदत मिळू शकते.

4) आतड्यांतील बॅक्टेरिया नष्ट करतो

त्यातील अ‍ॅंटी-मायक्रोबिअल गुण आतड्यातील नुकसानकारक बॅक्टेरिया कमी करतात.

5) पचनशक्ती सुधारते

गॅस, अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे यावर आराम मिळतो आणि पचन मजबूत बनतं.

6) सूज व इंफ्लेमेशन कमी करते

ओवा आणि आलं दोन्हीमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी व अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे शरीरातील सूज कमी करतात.

7) मासिक पाळीत फायदेशीर

जर तुम्ही नियमितपणे ओव्याच्या चहा प्याल तर तुमच्या एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याच्या सेवनाने महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.

ओव्याचा पानांचा चहा कसा कराल?

एक ग्लास पाणी उकळा. काही ताजी ओव्याची पानं धुवून हलके कूटून घ्या. छोटा तुकडा आलं कूटून घ्या. दोन्ही गोष्टी उकळत्या पाण्यात टाका. पाणी अर्धं राहिल्यावर गॅस बंद करा. गाळून गरमागरम प्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Ditch milk tea, drink carom leaves tea for amazing health benefits.

Web Summary : Carom leaves tea, rich in antioxidants, fiber, and vitamins, offers numerous health benefits. It aids digestion, reduces inflammation, relieves migraines, and eases menstrual pain. Drinking it in the morning or after dinner is ideal for optimal health.
टॅग्स :अन्नथंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्स