Curry Leaves Benefits : तुमच्या घराच्या अंगणात किंवा किचन गार्डनमध्ये उगवणारा एक साधा दिसणारा पाला तुमचं आरोग्य पूर्णपणे बदलू शकतो, आणि तो पाला म्हणजे कढीपत्ता. आपण बहुतेक वेळा फक्त चव वाढवण्यासाठी किंवा फोडणीसाठी या पानांचा वापर करतो. पण जर तुम्ही हा छोटासा पाला रोजच्या आहारात समाविष्ट केला, तर फक्त १४ दिवसांतच तुमचे केस, त्वचा, पचन आणि रक्तातील साखर यावर जबरदस्त परिणाम दिसू शकतो.
कढीपत्ता इतका खास का आहे?
कढीपत्त्यात असलेले नैसर्गिक तत्व आणि पोषक घटक त्याला एक शक्तिशाली औषधी वनस्पती बनवतात. यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, आयर्न, कॅल्शियम, तसेच व्हिटॅमिन A, B, C आणि E असतात. आयुर्वेदात कढीपत्त्याला 'दीपन आणि पचन' गुणधर्म असलेला मानलं जातं. म्हणजेच तो शरीरातील अग्नी वाढवतो करतो आणि अन्नाचे पचन सुधारतो. आधुनिक संशोधनानुसार, कढीपत्त्यात Antioxidant, Anti-diabetic, Anti-cancer, Antimicrobial आणि Cardio-protective गुण आढळतात.
१४ दिवस कढीपत्ता खाल्ल्याने होणारे फायदे
शरीरातील विषारी घटक बाहेर काढतं
कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरात निर्माण होणारे फ्री रॅडिकल्स निष्क्रिय करतात. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या, सैलपणा कमी होतो आणि पेशी लवकर रिपेअर होतात. यामुळे त्वचा, केस आणि एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
पचनक्रिया मजबूत करतो
कढीपत्ता पचनसंस्थेतील एन्झाईम्स सक्रिय करतो, ज्यामुळे अन्नाचे विघटन आणि पोषकतत्त्वांचे शोषण सुधातं. नियमित सेवन केल्याने गॅस, अपचन, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी दूर होतात.
केस मजबूत होतात
कढीपत्त्यातील बीटा-कॅरोटीन आणि प्रथिनं केसांच्या मुळांना पोषण देतात. त्यामुळे केसगळती कमी होते, केस दाट व मजबूत होतात आणि अकाली पांढरे होणे टाळले जाते.
त्वचेला नैसर्गिक तेज मिळतं
कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट आणि दाहशामक गुण त्वचेला आतून पोषण देतात. यामुळे त्वचेचा टोन उजळतो, पिंपल्स आणि डाग-चट्टे कमी होतात, तसेच वृद्धत्वाची लक्षणं उशिरा दिसतात.
ब्लड शुगर कंट्रोल
संशोधनानुसार, कढीपत्त्यातील तत्व इन्सुलिनची क्रिया सुधारतात आणि स्टार्चचे ग्लुकोजमध्ये रूपांतर स्लो करतात. त्यामुळे रक्तातील साखरेचा अचानक वाढ होण्याचा धोका कमी होतो आणि डायबिटीस नियंत्रित राहतो.
हृदय निरोगी राहतं आणि कोलेस्टेरॉल कमी करतो
कढीपत्त्यातील अल्कॉइड्स आणि फ्लॅव्होनॉइड्स वाईट कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्स कमी करतात, तर चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कढीपत्ता खाण्याचे सोपे उपाय
सकाळी रिकाम्या पोटी ताजे कढीपानं खा. ४–५ ताजे कढीपत्ते घेऊन कोमट पाण्यासोबत चावून खा. त्यामुळे अँटिऑक्सिडंट्सचे शोषण शरीरात अधिक होते.
कढीपत्ता ताक
एका ग्लास ताकात एक मूठभर कढीपत्ते, थोडंसं जिरं पावडर आणि सैंधव मीठ टाका. हे पेय पचन सुधारतं आणि दिवसभर ताजेतवाने ठेवतं.
कढीपत्ता चटणी पावडर
कढीपत्ते, उडद डाळ आणि चनाडाळ थोडी भाजून त्यात मीठ घालून बारीक पूड करा. ही पूड भात, डाळ किंवा भाजीवर शिंपडून खा.
