Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मऊ लुसलुशीत एकदम हलकी इडली खायची आहे? इडलीच्या पिठात 'या' पद्धतीने घाला तेल, बघा तेलाची जादू...

मऊ लुसलुशीत एकदम हलकी इडली खायची आहे? इडलीच्या पिठात 'या' पद्धतीने घाला तेल, बघा तेलाची जादू...

Cooking Tips: इडलीच्या पिठामध्ये तेल घालण्याची ही खास ट्रिक तुम्हाला माहिती आहे का बघा त्यामुळे नेमकं काय होतं...(amazing benefits of adding hot oil in idli batter)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 16:58 IST2025-11-03T16:45:57+5:302025-11-03T16:58:18+5:30

Cooking Tips: इडलीच्या पिठामध्ये तेल घालण्याची ही खास ट्रिक तुम्हाला माहिती आहे का बघा त्यामुळे नेमकं काय होतं...(amazing benefits of adding hot oil in idli batter)

amazing benefits of adding hot oil in idli batter, special trick for soft and spongy idli, how to make perfect idli  | मऊ लुसलुशीत एकदम हलकी इडली खायची आहे? इडलीच्या पिठात 'या' पद्धतीने घाला तेल, बघा तेलाची जादू...

मऊ लुसलुशीत एकदम हलकी इडली खायची आहे? इडलीच्या पिठात 'या' पद्धतीने घाला तेल, बघा तेलाची जादू...

Highlightsया पद्धतीने इडल्या केल्यामुळे तुम्हाला इडल्यांमध्ये तर खूप चांगला फरक तर जाणवेलच पण इडलीची चवही आणखी खुलल्यासारखी वाटेल.

इडली- सांबार, इडली- चटणी हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. नाश्त्यामध्ये तर अनेक जणांना इडलीच हवी असते. कारण ती पचायला हलकी असते आणि शिवाय तिची चव तर आवडतेच.. म्हणूनच बाजारात विकत मिळत असलं तरी आपण घरी हौशीने इडलीचं पीठ तयार करतो. पण बऱ्याचदा असं होतं की आपण केलेल्या इडल्या थोड्या घट्ट होतात. व्यवस्थित न फुगल्याने त्यांच्यामध्ये जडपणा असतो. आता उडप्याच्या हॉटेलमध्ये किंवा साऊथमध्ये मिळते तशी मऊसूत, चमकदार आणि हलकी फुलकी इडली घरीच करायची असेल तर त्यासाठी ही एक खास ट्रिक वापरून पाहा...(amazing benefits of adding hot oil in idli batter)

 

इडलीच्या पिठात तेल का घालावं?

साऊथमधल्या कित्येक लोकांचा इडली हा रोजचा पदार्थ असतो. त्यामुळे इडल्या करताना ते कित्येक वेगवेगळे प्रयोग करून पाहतात. त्यामुळेच त्यांच्याकडे डोसा, इडली, उत्तप्पा असे दाक्षिणात्य पदार्थ अतिशय उत्तम पद्धतीने कसे करायचे याच्या अनेक ट्रिक्स असतात.

पांढरे केस काळे होतीलच, पण डोक्यातला कोंडाही कमी होईल- घ्या कमालीचा 2 in 1 उपाय...

त्यापैकीच एक म्हणजे इडलीच्या पिठामध्ये तेल घालणे. कित्येक साऊथ इंडियन घरांमध्ये इडली करण्यापुर्वी पिठामध्ये तेल घातलं जातं. तेलामुळे इडल्या आणखी हलक्या, चमकदार आणि अतिशय मऊ हाेतात. पण त्यासाठी ते तेल योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घातलं जाणं गरजेचं आहे. 

 

इडलीच्या पिठात कधी आणि कसं तेल घालावं?

डाळ आणि तांदूळ वाटून घेतल्यानंतर ते फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिले जातात. पीठ फर्मेंट झाल्यानंतर आपण जेव्हा त्याच्या इडल्या करायला घेतो त्यापुर्वी साधारण १० ते १५ मिनिटे आधी एका वाटीमध्ये एक ते दिड चमचा तेल अगदी गरम करून घ्या आणि त्यानंतर ते इडलीच्या पिठामध्ये घाला.

Weight Loss Tips: महिलांचं वजन वाढवणाऱ्या २ गोष्टी- बघा तुम्ही पण त्याच चुका करताय का

सगळं पीठ व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर त्या पिठाच्या इडल्या करा. या पद्धतीने इडल्या केल्यामुळे तुम्हाला इडल्यांमध्ये तर खूप चांगला फरक तर जाणवेलच पण इडलीची चवही आणखी खुलल्यासारखी वाटेल. अशी इडली नुसती खायलाही मस्त लागते. शिवाय इडली पात्राला इडलीचे पीठ अजिबात चिटकून बसत नाही. पुढल्यावेळी इडली करताना ही ट्रिक वापरून पाहा. 


 

Web Title : नरम इडली के लिए: घोल में गरम तेल डालकर देखें जादू!

Web Summary : नरम, स्पंजी इडली चाहिए? दक्षिण भारतीय रसोइया भाप देने से पहले घोल में गरम तेल डालते हैं। इससे वे हल्के, चमकदार और अधिक स्वादिष्ट बनते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए फर्मेंटेशन के 10-15 मिनट बाद एक चम्मच गरम तेल डालें। स्वादिष्ट, चिपचिपी इडली का आनंद लें!

Web Title : Soft, fluffy idlis: Add hot oil to batter for magic!

Web Summary : Want soft, fluffy idlis? South Indian cooks add hot oil to the batter before steaming. This makes them lighter, shinier and more delicious. Add a spoonful of hot oil 10-15 minutes after fermentation for the best results. Enjoy tastier, non-sticky idlis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.