नवरात्रीचा सण म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो नऊ दिवसांचा उपवास. नवरात्रीत या नऊ दिवसांच्या उपवासाला आपण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ तयार (Rajgira & Ratale Puri For Fastig) करुन खातो. उपवास असला की आपल्या खाण्यावर बंधन येतात आणि काही मोजकेच पदार्थ खाऊ शकतो. उपवासाच्या पदार्थांमध्ये राजगिरा आणि रताळं हे दोन्ही पदार्थ कायम खाल्ले जातात. राजगिरा आणि रताळं (How To Make Rajgira & Ratale Puri For Fastig) हे दोन्ही पदार्थ भरपूर पौष्टिक असतात, त्यामुळे उपवासाच्या दिवसांत या पदार्थांपासून आपण इतरही उपवासाचे चविष्ट पदार्थ झटपट तयार करु शकतो. उपवासाच्या दिवशी काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते(Amaranth Flour & Sweet Potato Puri For Fasting).
उपवासाचे नऊ दिवस साबुदाणा वडे किंवा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही राजगिरा आणि रताळ्याच्या पुऱ्या नक्कीच करून पाहू शकता. राजगिरा आणि रताळे दोन्ही उपवासासाठी योग्य असून, आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. या पुऱ्या बनवायला सोप्या आहेत आणि खायलाही खूप चविष्ट लागतात. उपवासाच्या दिवसांत राजगिरा शरीराला इन्स्टंट उर्जा देतो तर रताळे पचायला हलके आणि गोडसर असल्याने पुऱ्यांना खास चव येते. मस्त गरमागरम, कुरकुरीत, खमंग आणि मन तृप्त करणाऱ्या या पुऱ्या उपवासाचा आनंद नक्कीच द्विगुणित करतात. राजगिरा व रताळ्याच्या खुसखुशीत टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार करण्याची सोपी रेसिपी पाहा.
साहित्य :-
१. राजगिरा पीठ - २ कप
२. रताळं - १ कप (उकडलेल्या रताळ्याचा किस)
३. कोथिंबीर - १/२ कप
४. जिरेपूड - १ टेबलस्पून
५. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. साजूक तूप - १ टेबलस्पून
८. तेल - तळण्यासाठी
९. पाणी - गरजेनुसार
अर्धा चिरलेला लिंबूही राहील जास्त दिवस ताजा! ५ भन्नाट ट्रिक्स - आठवडाभरानंतरही मिळेल भरपूर रस...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये राजगिऱ्याचे पीठ घेऊन त्यात उकडवून घेतलेल्या रताळ्याचा किस घालावा.
२. मग या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, साजूक तूप घालावे.
३. सगळ्यात शेवटी या मिश्रणात गरजेनुसार थोडे - थोडे पाणी घालून पीठ थोडे घट्ट मळून घ्यावे.
उपवासाची काजू कतली! करायला सोपी, जिभेवर रेंगाळणारी चवं - फराळाच्या ताटात हवाच असा पदार्थ...
४. मळून घेतलेल्या पिठाचे मध्यम आकारचे गोळे तयार करुन घ्यावेत.
५. पोळपाटाला हलकेसे तेल लावून पुऱ्या लाटून घ्याव्यात.
६. कढईत तेल गरम करून त्यात पुऱ्या सोडून हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत पुऱ्या खरपूस तळून घ्याव्यात.
गरमागरम राजगिरा - रताळ्याच्या पुऱ्या दह्यासोबत खायला अधिकच चविष्ट लागतात.