Lokmat Sakhi >Food > अळूच्या पानांचे खमंग, खुसखुशीत थालीपीठ! सकाळच्या नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ - ही घ्या रेसिपी...

अळूच्या पानांचे खमंग, खुसखुशीत थालीपीठ! सकाळच्या नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ - ही घ्या रेसिपी...

Aluchya Pananchya Dethache Thalipeeth : Taro Leaves Thalipith : Aluchya Pananche Thalipith Reciep : सकाळच्या गडबडीत नाश्त्याला खमंग, खुसखुशीत पण पौष्टिक पदार्थ हवा असेल तर अळूच्या पानांचे थालीपीठ करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2025 15:11 IST2025-08-04T15:00:58+5:302025-08-04T15:11:56+5:30

Aluchya Pananchya Dethache Thalipeeth : Taro Leaves Thalipith : Aluchya Pananche Thalipith Reciep : सकाळच्या गडबडीत नाश्त्याला खमंग, खुसखुशीत पण पौष्टिक पदार्थ हवा असेल तर अळूच्या पानांचे थालीपीठ करून पाहा...

Aluchya Pananchya Dethache Thalipeeth Taro Leaves Thalipith Aluchya Pananche Thalipith Reciep | अळूच्या पानांचे खमंग, खुसखुशीत थालीपीठ! सकाळच्या नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ - ही घ्या रेसिपी...

अळूच्या पानांचे खमंग, खुसखुशीत थालीपीठ! सकाळच्या नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ - ही घ्या रेसिपी...

श्रावण आणि पावसाळ्याच्या या दिवसांत बाजारांत मस्त हिरव्यागार अशा रानभाज्या विकायला असतात. आपल्यापैकी बहुतेक घरात आजही या रानभाज्या मोठ्या हौसेने करुन आवडीने खाल्ल्या जातात. रानभाज्या एरवी वर्षभर मिळत नसल्याने त्या खाण्याचा (Taro Leaves Thalipith) आनंद काही वेगळाच असतो. पावसाळ्यात मिळणाऱ्या (Aluchya Pananchya Dethache Thalipeeth) रानभाज्यांपैकी 'अळू' ही बहुतेक सगळ्यांचीच आवडती रानभाजी. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सणावाराच्या निमित्ताने या अळूच्या पानांचे वेगवेगळे पदार्थ हमखास घरोघर तयार केले जातात. अळूची भाजी, वडी, अळूचं फदफदं हे त्यापैकीच काही लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ(Aluchya Pananche Thalipith Reciep).

अळूच्या या पदार्थांसोबतच आपण त्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देखील तयार करु शकतो. अळूच्या ताज्या हिरव्यागार पानांचे पौष्टीक असे थालीपीठ हा एक खमंग - खुसखुशीत पदार्थ. नाश्त्याला आपण भाजणीचे थालीपीठ मोठ्या आवडीने करून खातो. परंतु नेहमीचे तेच ते थालीपीठ खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आपण अळूच्या पानांचे पौष्टिक असे थालीपीठ एकदा तरी नक्की ट्राय करून पाहू शकतो. सकाळच्या गडबडीत नाश्त्याला खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक पण इन्स्टंट होणारा नवीन पदार्थ हवा असेल तर अळूच्या पानांच्या थालीपिठाची ही घ्या साधीसोपी रेसिपी...     

साहित्य :- 

१. बाजरीचे पीठ - १ कप 
२. गव्हाचे पीठ - १ कप  
३. बेसन - १ कप 
४. तांदळाचे पीठ - १/२ कप 
५. गरम मसाला - १ टेबलस्पून  
६. जिरे - १ टेबलस्पून 
७. हळद - १ टेबलस्पून 
८. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
९. धणे पावडर - १ टेबलस्पून 
१०. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या 
११. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
१२. कोथिंबीर - १ ते २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१३. आल लसूण पेस्ट - १ टेबलस्पून 
१४. मीठ - चवीनुसार
१५. कोकम आगळ - १ टेबलस्पून 
१६. पाणी - गरजेनुसार
१७. अळूची पाने - ४ ते ६ पाने
१८. पांढरे तीळ - १ टेबलस्पून 
१९. तेल - ३ ते ४ टेबलस्पून 

भन्नाट चवीची चमचमीत भरवा कारली! कडू कारलं लागेल चविष्ट आणि होईल फेवरिट...


Alu Vadi : अळूवडी करताना टाळा ‘या’ चुका, मग अळूवडी कायमच होईल परफेक्ट कुरकुरीत...

कृती :- 

१. अळूची पाने स्वच्छ धुवून - पुसून त्याच्या शिरा कापून घ्याव्यात. त्यानंतर, अळूची पाने बारीक चिरून घ्यावीत.
२. एका मोठया बाऊलमध्ये बारीक चिरलेली अळूची पाने घेऊन त्यात बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन, तांदळाचे पीठ, गरम मसाला, जिरे, लाल मिरची पावडर, धणे पावडर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आल लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, कोकम आगळं घालावे. 

Shravan Food : राजगिरा आणि शेंगदाण्याची बर्फी करा घरीच, उपवास स्पेशल पौष्टिक खाऊ - महिनाभर टिकेल...

३. आता हे सगळे मिश्रण चमच्याने किंवा हातांनी कालवून एकजीव करून घ्यावे. मग यात गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. 
४. आता एक हलकासा असा ओलसर रुमाल घेऊन त्यावर तयार पिठाचा गोळा ठेवून हाताने थालीपीठ थापून घ्यावे. थापून घेतलेली थालीपिठावर थोडे पांढरे तीळ व्यवस्थित भुरभुरवून घालावेत. 
५. पॅनवर तेल लावून तयार थालीपीठ खरपूस असे भाजून घ्यावे. थालीपिठाला हलकासा गोल्ड ब्राऊन रंग येईपर्यंत ते दोन्ही बाजुंनी व्यवस्थित भाजून घ्यावे. 

मस्त गरमागरम अळूच्या पानांचे पौष्टीक असे थालीपीठ दही, लोणचं, चटणी किंवा ताज्या लोण्यासोबत खाल्ल्याने त्याची चव अधिकच भारी लागते. यंदाच्या श्रावणात ताज्या हिरव्यागार अळूच्या पानांचे थालीपीठ नक्की करून पाहा.

Web Title: Aluchya Pananchya Dethache Thalipeeth Taro Leaves Thalipith Aluchya Pananche Thalipith Reciep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.