Join us
Daily Top 2Weekly Top 5

पदार्थांत वापरलेलं पनीर खरं आहे की फेक, मेन्यूकार्डवर लिहा! महाराष्ट्रात हॉटेलवाल्यांना सक्त ताकीद, खबरदार जर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 17:33 IST

Health Tips: आपण पनीर म्हणून जे काही खातो, ते बऱ्याचदा पनीर नसतंच.. म्हणूनच महाराष्ट्रातल्या रेस्टॉरंट्स आणि पनीर विकणाऱ्या व्हेंडर्सला काही गोष्टींची सक्ती करण्यात आली आहे.

रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलं की लहान मुलांची पहिली पसंती असते ती पनीरची भाजी. पनीर बटर मसाला, पनीर टिक्का मसाला, पनीर कढई अशा पनीरच्या भाज्या ते सर्रास ऑर्डर करतात. एवढंच नाही तर स्टार्टरमध्येही त्यांना पनीरचे वेगवेगळे पदार्थच हवे असतात. मोठी माणसंही मुलांना ते खाऊ देतात, कारण पनीर पौष्टिक असतं, त्यातून प्रोटीन्स मिळतात हे आपल्याला माहिती असतं. पण हल्ली मात्र कित्येक रेस्टॉरंट्समध्ये पनीर नसतंच. पनीर सारखं दिसणारं ते चीज ॲनालॉग असतं. अशा कित्येक केसेस उघडकीस आल्यानंतर अन्न व सुरक्षा विभागाने असा नियमच काढला आहे की महाराष्ट्रातल्या रेस्टॉरंट्सनी तसेच पनीर विकणाऱ्या व्हेंडर्सनी तुम्ही पनीर विकत आहात की चीज ॲनालॉग हे मेन्यूकार्डवर स्पष्ट लिहायचं आहे. 

पनीर आणि चीज ॲनालॉगमध्ये काय फरक?

 

चीज ॲनालॉग हे हुबेहुब पनीरसारखे दिसणारे असते. पण ते वेगवेगळ्या प्रकारचे एडिबल ऑईल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ वापरून तयार केलेले असते.

डॉक्टर सांगतात 'हा' पदार्थ म्हणजे उन्हाळ्यातला परफेक्ट नाश्ता, बघा रेसिपी- वाचा त्याचे फायदे

पण पनीर तयार होण्यासाठी फक्त दूध गरजेचे असते. चीज ॲनलाॅगची चवही अगदी पनीर सारखीच असते. पण त्यात पनीरसारखे पौष्टिक घटक नसतात. अन्न व सुरक्षा विभागाने हे देखील जाहीर केले आहे की चीज ॲनालॉग हे आरोग्यासाठी घातक नाही. पण पनीर म्हणून ते विकले जाणे हे मात्र ग्राहकांची फसवणूक केल्यासारखे आहे. त्यामुळे त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यू कार्डवर करायला हवा. 

तसेच या बाबतीत ग्राहकांनीही सतर्क राहायला हवं असंही FDA ने सुचवलं आहे. ग्राहकांनी मेन्यूकार्डवरील उल्लेख व्यवस्थित वाचावा, तसेच पनीर विकत घेतल्यावर त्याच्या पाकिटावर ॲनालॉग असं कुठे लिहिलेलं आहे का ते तपासावं.

ठणकणाऱ्या दाढा, दुखणाऱ्या हिरड्या चटकन बऱ्या होतील, 'हे' घरगुती दंतमंजन वापरा, मोत्यासारखे चमकतील दात

जर तुम्ही सुटं पनीर घेत असाल तर विक्रेत्याला ते खरंच पनीर आहे की नाही याविषयी स्पष्ट विचारावं. ग्राहक सतर्क राहिले की आपोआपच विक्रेत्यांवर आणि रेस्टॉरंट चालकांवरही दबाव येतो. त्यामुळे ग्राहकांनीही या बाबतीत खबरदारी घ्यावी. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Restaurants Must Declare Real or Fake Paneer on Menu

Web Summary : Maharashtra mandates restaurants to clearly state on menus whether paneer dishes use real paneer or cheese analogue, following concerns about misrepresentation. Consumers are advised to check packaging and inquire with vendors to avoid deception.
टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स