Join us

गरोदरपणात आलिया भट खात असलेल्या बिट सॅलेडची व्हायरल चर्चा; पाहा काय तिची स्पेशल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 17:36 IST

Benefits of making beet salad: आलिया भटची खास रेसिपी असलेलं हे बिटरुट सॅलेड सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. बघा त्याच सॅलेडची ही सोपी रेसिपी 

ठळक मुद्देबिट जर नुसतं खायला आवडत नसेल तर ही रेसिपी ट्राय करून बघायला हरकत नाही.

प्रत्येक अभिनेत्रीची अशी एक स्पेशल हेल्दी डिश असतेच. त्याची रेसिपी ही त्यांची खास असते. मागे एकदा कतरिना कैफ (Katrina Kaif) घेत असलेल्या ॲव्हाकॅडो ज्यूसची रेसिपीही अशीच व्हायरल झाली होती. आता आलिया भटच्या (Alia Bhatt) बिट रूट सॅलेडची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. रेसिपी (beet root salad recipe) तशी सोपी आहे. त्यामुळे बिट जर नुसतं खायला आवडत नसेल तर ही रेसिपी ट्राय करून बघायला हरकत नाही. पौष्टिक बिट पोटात जाईल आणि शिवाय वेगळं काही खाल्ल्याचा आनंदही मिळेल.

 

बिट सॅलेड रेसिपीसाहित्यअर्धा कप किसलेलं बीटदिड टेबलस्पून दहीपिंक सॉल्ट चवीनुसार

एक चमचा दालचिनीची जादू! दिवाळीत चेहऱ्यावर चमक, मनात उत्साह हवा? करुन बघा हा झटपट उपायजीरेपूड अर्धा टीस्पूनमिरेपूड अर्धा टीस्पून१ टीस्पून बारीक चिरलेला पुदिनाअर्धा टीस्पून तेलअर्धा टीस्पून मोहरीकढीपत्त्याची ५ ते ६ पाने१ हिरवी मिरची.

कृती१ बीट घ्या. व्यवस्थित धुवून त्याची सालं काढून टाका आणि ते काही उकडून घ्या.

बीट उकडून झाल्यावर ते बारीक करून घ्या. एका भांड्यात काढा  आणि त्यात दही आणि इतर पदार्थ टाका.

प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार..

आता त्यात चाट मसाला आणि मिरेपूड टाका. तसेच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाका.

सॅलेडला फोडणी देण्यासाठी लहान आकाराची कढई गॅसवर ठेवा. तेल, मोहरी, हिंग, जिरे, कढीपत्त्याची पाने टाकून फोडणी करून घ्या.

ही फोडणी आता सॅलेडमध्ये टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. हवं तर चवीसाठी तुम्ही चिमुटभर साखरही टाकू शकता. 

 

बीट सॅलेड खाण्याचे फायदे१. कोणत्याही प्रकारच्या जेवणासोबत हे सॅलेड चवदार लागते.

२. १०० ग्रॅम बीटमधून आपल्याला ४३ कॅलरीज, २. ८ ग्रॅम फायबर, १० ग्रॅम कॉम्प्लेक्स कार्ब्स मिळतात.

जान्हवी कपूरचा २५ हजारांचा भरजरी कुर्ता! चंदेरी सिल्कवर थ्रेडवर्कची बघा सुंदर नजाकत 

३. बीटमध्ये असणारे पौष्टिक घटक चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने तेज आणण्यासाठी मदत करतात.

४. बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि मॅग्नेशियम असते. 

५. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी बीटचा फायदा होतो. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आलिया भट