Join us

जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2024 14:05 IST

Alia Bhatt's Favorite Beet Root Salad: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही घालून केलेली कोशिंबीर किंवा एखादं सॅलेड पाहिजेच असतं. म्हणूनच बघा आलिया भट सांगतेय ती बीटरुट सॅलेड रेसिपी. (How to make beet root salad)

ठळक मुद्देझटपट होणारं हे चवदार सॅलेड एकदा करून बघाच. 

एरवी वर्षभर बरेच जण आंबट किंवा थंड पदार्थ फारसे खात नाहीत. पण उन्हाळ्यात मात्र थंड, आंबट पदार्थ अगदी हवेहवेसे वाटतात. त्यामुळेच तर दुपारच्या जेवणात ताज्या कैरीचा एखादा पदार्थ असतो किंवा थंडगार दही घालून केलेलं सॅलेड किंवा कोशिंबीर, रायतं असं काहीतरी असतं. असे आंबट, थंड पदार्थ जेवणात असतील तर उन्हाळ्यातल्या जेवणाची मजा नक्कीच वाढते (summer special viral recipe). म्हणूनच सध्या आलिया भटने सांगितलेल्या बीटरुट सॅलेडची रेसिपी (Alia Bhatt's favorite beet root salad) सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. (How to make beet root salad)

 

आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड रेसिपी

साहित्य

१ लहान आकाराचं बीट

अर्धी वाटी दही

२ टीस्पून चाट मसाला

बटाट्याचे चिप्स लालसर- काळे पडतात?८ खास टिप्स, पांढरेशुभ्र होतील वेफर्स-वर्षभर टिकतील

१ टीस्पून मीरेपूड

चवीनुसार मीठ

कडिपत्त्याची ५ ते ६ पाने

फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे आणि हिंग

चिमूटभर साखर

 

कृती

सगळ्यात आधी बीटरुट एखाद्या जाडसर किसनीने किसून घ्या. 

किसलेलं बीटरुट एका भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही टाका.

चिंच- गुळाची आमटी! तेच ते नेहमीचं वरण खाऊन कंटाळा आल्यास करा आंबट- गोड बेत

त्यामध्ये मीरेपूड, चाटमसाला टाका.

आता या सॅलेडमध्ये टाकण्यासाठी एका छोट्या कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे आणि चिमूटभर हिंग टाकून फोडणी करून घ्या. त्यामध्येच थोडासा कडिपत्ता टाका.

 

फोडणीमध्ये जिरे न टाकता तुम्ही सलाडमध्ये थेट जिरेपूड टाकली तरी चालेल. त्यामुळे जिऱ्यांचा जास्त छान सुवास सलाडला येईल. 

आता केलेली फोडणी बीटरुट सलाडवर घाला. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि सगळं सलाड छान हलवून एकजीव करून घ्या. 

माठ विकत आणताना तपासून घ्या ३ गोष्टी, पाणी होईल फ्रिजसारखं गारेगार- करा पैसावसूल खरेदी 

आलिया भटने सांगितलेल्या रेसिपीमध्ये साखर घातलेली नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर सलाडची चव बॅलेन्स करण्यासाठी आणि कोशिंबीर किंवा सलाडमध्ये थोडा गोडवा आणण्यासाठी चिमूटभर साखर घातली तरी चालेल.

झटपट होणारं हे चवदार सलाड एकदा करून बघाच. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आलिया भटसमर स्पेशल