Lokmat Sakhi >Food > ऐश्वर्या नारकर सांगतात अळूवडी करण्याची खास रेसिपी, बेसनाऐवजी 'हा' पदार्थ घाला; वड्या जास्त चवदार होतील

ऐश्वर्या नारकर सांगतात अळूवडी करण्याची खास रेसिपी, बेसनाऐवजी 'हा' पदार्थ घाला; वड्या जास्त चवदार होतील

Aishwarya Narkar special alu vadi recipe: अळूवडी करण्याची एक खास रेसिपी ऐश्वर्या नारकर यांनी साेशल मिडियावर शेअर केली आहे.(how to make alu vadi?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2025 16:29 IST2025-08-04T16:28:28+5:302025-08-04T16:29:25+5:30

Aishwarya Narkar special alu vadi recipe: अळूवडी करण्याची एक खास रेसिपी ऐश्वर्या नारकर यांनी साेशल मिडियावर शेअर केली आहे.(how to make alu vadi?)

Aishwarya narkar special alu vadi recipe, how to make alu vadi, alu vadi recipe in Marathi | ऐश्वर्या नारकर सांगतात अळूवडी करण्याची खास रेसिपी, बेसनाऐवजी 'हा' पदार्थ घाला; वड्या जास्त चवदार होतील

ऐश्वर्या नारकर सांगतात अळूवडी करण्याची खास रेसिपी, बेसनाऐवजी 'हा' पदार्थ घाला; वड्या जास्त चवदार होतील

Highlightsसामान्यपणे अळूवडी करण्यासाठी बेसनपीठ वापरले जाते. पण ऐश्वर्या नारकर यांनी त्याऐवजी एक खास पदार्थ वापरण्याचा सल्ला दिला आहे.

अळूवडी हा अनेक जणांचा अतिशय आवडीचा पदार्थ. खमंग, खुसखुशीत अळूवड्या श्रावणातल्या रिमझिम पावसात तर खायलाच हव्या. प्रत्येक प्रांतानुसार अळूवडी करण्याची पद्धत बदलत जाते. आता हेच पाहा ना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही अळूवडी करण्याची त्यांची खास रेसिपी सोशल मीडियावर शेअर केली आहे (Aishwarya narkar special alu vadi recipe). सामान्यपणे अळूवडी करण्यासाठी बेसनपीठ वापरले जाते. पण ऐश्वर्या नारकर यांनी त्याऐवजी एक खास पदार्थ वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अळूवडी जास्त चविष्ट आणि पौष्टिक होते (how to make alu vadi?). त्यांनी सांगितलेली रेसिपी पाहा आणि एकदा नक्की ट्राय करा.(alu vadi recipe in Marathi)

अळूवडी करण्याची ऐश्वर्या नारकर यांची रेसिपी

 

साहित्य

१ वाटी मुगाच्या डाळीचे पीठ. बेसनाऐवजी मुगाचे पीठ वापरा असं त्या सांगतात.

पाव वाटी तांदळाचे पीठ. तांदळाच्या पिठामुळे वड्या जास्त खुसखुशीत होतात.

घरातलेच साहित्य वापरून १० मिनिटांत करा मंगळागौरीची आकर्षक सजावट- सगळेच करतील कौतूक

४ ते ५ चमचे चिंचगुळाचा कोळ

चवीनुसार लाल तिखट, मीठ, धने- जिरेपूड

तळण्यासाठी तेल

 

कृती

एका भांड्यात मुगाच्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घ्या. त्या पिठामध्ये तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, मीठ आणि चिंचेचं पाणी घालून पीठ सरसरीत भिजवून घ्या.

अळुच्या पानांची देठं कापून घ्या. यानंतर ती पानं लाटण्याने लाटून घ्या. जेणेकरून त्याच्या शिरा दबून जातील. यानंतर पानं स्वच्छ धुवून घ्या आणि ती कोरडी करून एका जागी पसरवून ठेवा.

'हा' आहे पुनम ढिल्लोंचा आवडता फेसमास्क! वाढत्या वयातही सौंदर्य कमी होऊ न देण्याचा खास उपाय.. 

आता त्या पानांच्या एका बाजुला सारण लावून घ्या आणि पानं हळूहळू दुमडून घ्या. दुमडतानाही त्याला सारण लावत चला आणि त्याची गुंडाळी किंवा उंडे करा.

आता कुकरची शिट्टी काढून घ्या आणि त्यामध्ये साधारण १५ ते २० मिनिटे अळूच्या पानांची गुंडाळी किंवा उंडे वाफवून घ्या.

उंडे थंड झाल्यानंतर सुरी घेऊन त्याच्या वड्या पाडा आणि नंतर त्या खमंग तळून घ्या. कुरकुरीत, खमंग अळू वडी तयार.

 

हे देखील वाचा

ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलेली रेसिपी छानच आहे. पण त्यासोबतच तुम्ही अळूवडी करताना त्यात आणखी काही बदलही करू शकता.

जसे की सारण तयार करताना त्यात थोडे तीळ घाला. यामुळे वड्या जास्त क्रंची होतात.

शरीरातली प्रोटीन्सची कमतरता दूर करणारा चवदार उपाय- जेवणात घ्या ५ पदार्थ; भरपूर प्रोटीन्स मिळतील

त्याचप्रमाणे वडीच्या सारणामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घातली तर वड्यांना आणखी खमंग चव येऊ शकते. 

काही भागात वड्या तळून झाल्यानंतर त्यावर जिरं, मोहरी, कडिपत्ता, तीळ अशी फोडणी घातली जाते. तो प्रकारही चवदार लागतो. 


 

Web Title: Aishwarya narkar special alu vadi recipe, how to make alu vadi, alu vadi recipe in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.