Lokmat Sakhi >Food > पेरुची पानं उपाशीपोटी खाण्यानं खरंच प्रतिकारशक्ती वाढते, पोट साफ होतं का? पाहा पेरुच्या पानांचे फायदे

पेरुची पानं उपाशीपोटी खाण्यानं खरंच प्रतिकारशक्ती वाढते, पोट साफ होतं का? पाहा पेरुच्या पानांचे फायदे

Guava Leaves Health Benefits : अनेकांना हे माहीत नाही की, पेरूसोबतच पेरूच्या पानांमध्येही अनेक औषधी गुण असतात. पेरूच्या पानांमध्ये भरूर प्रमाणात खनिज, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:05 IST2025-05-15T13:03:22+5:302025-05-15T15:05:30+5:30

Guava Leaves Health Benefits : अनेकांना हे माहीत नाही की, पेरूसोबतच पेरूच्या पानांमध्येही अनेक औषधी गुण असतात. पेरूच्या पानांमध्ये भरूर प्रमाणात खनिज, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात.

Advantages of chewing guava leaves on an empty stomach | पेरुची पानं उपाशीपोटी खाण्यानं खरंच प्रतिकारशक्ती वाढते, पोट साफ होतं का? पाहा पेरुच्या पानांचे फायदे

पेरुची पानं उपाशीपोटी खाण्यानं खरंच प्रतिकारशक्ती वाढते, पोट साफ होतं का? पाहा पेरुच्या पानांचे फायदे

Guava Leaves Health Benefits :  आंबट-गोड चवीचा पेरू खाण्याचा आनंद सगळेच घेत असतात. पेरूची टेस्ट सगळ्यांना तर आवडतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पेरूमध्ये अनेक पोषक तत्व असतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, पेरूसोबतच पेरूच्या पानांमध्येही अनेक औषधी गुण असतात. पेरूच्या पानांमध्ये भरूर प्रमाणात खनिज, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशिअम भरपूर असतं. अशात पेरूची पाने सकाळी रिकाम्या पोटी चावून खाल्ल्यावर काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.

पेरूची पाने खाण्याचे फायदे

बद्धकोष्ठता लगेच होईल दूर

पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे बद्धकोष्ठतेची समस्या सहजपणे दूर करतं. याने पचनास मदत मिळते आणि सकाळी पोट लवकर साफ होतं. पेरूच्या पानांमुळे रक्तात ग्लूकोजची लेव्हल वाढणंही रोखलं जातं.

इम्यूनिटी वाढते

पेरूच्या पानांच्या सेवनाने जेवण केल्यावर ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन्स सी असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अशात शरीराचा अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. जे डोळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. नियमितपणे रिकाम्या पोटी पेरूच्या पानांचं सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली होते. पेरूच्या पानांमध्ये तणाव दूर करणारे गुण असतात आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.

पेरूच्या पानांचे इतर फायदे

- पेरूच्या पानांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि फायबर भरपूर असतात. या तत्वांमुळे तुमचं हृदय, पचन आणि शरीरक्रिया योग्य राहतात. 

- पेरूच्या पानांचा चहा सेवन केल्यावर जेवल्यावर वाढलेली ब्लड शुगर लेव्हल कमी होते. अशात डायबिटीसच्या रूग्णांनी या पानांचं किंवा याच्या चहाचं सेवन केलं पाहिजे.

- पेरूच्या पानांमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन हृदयाचा फ्री रॅडिकलपासून बचाव करतात. त्याशिवाय या पानांचा अर्क लो ब्लड प्रेशर, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो.

-  पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असतं. याने इम्यून सिस्टीम मजबूत होण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुमचा वेगवेगळ्या आजारांपासून आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. 

Web Title: Advantages of chewing guava leaves on an empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.