Join us

कलाकंदात भेसळ तर नाही ना? मिठाई शुद्ध आहे की भेसळयुक्त, ओळख कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:55 IST

Adulteration in Milk Cake: आपण कलाकंद खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा कलाकंदमध्ये भेसळ नाही हे कसं ओळखावं तेच आपण पाहणार आहोत.

Adulteration in Milk Cake: दिवाळीचे (Diwali 2025) दिवस जवळ आले की, भेसळीसंबंधी अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पनीर, दही, तूप, तेल किंवा वेगवेगळ्या मिठाईंमध्ये भेसळ केली जाते. दिवाळीत याच भेसळयुक्त मिठाई खाऊन आपल्या तब्येती बिघडतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या छतरपूरमधून समोर आली आहे. इथे तब्बल १० क्विंटल बनावट मिल्क केक म्हणजेच कलाकंद जप्त करण्यात आलंय. अशात आपण कलाकंद खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा कलाकंदमध्ये भेसळ नाही हे कसं ओळखावं तेच आपण पाहणार आहोत. जेणेकरून आपली तब्येत बिघडू नये.

मिठाईत भेसळ आरोग्यासाठी धोकादायक

कलाकंद म्हणजेच मिल्क केकमध्ये भेसळ करण्यासाठी कलाकंद बनवण्यासाठी वापरलेले दूध शुद्ध नसणे. जर मिठाईचा रंग अत्यंत चमकदार, वेगळा किंवा कृत्रिम वाटत असेल, तर त्यात भेसळ असण्याची शक्यता जास्त असते.

भेसळ ओळखण्याचे काही सोपे उपाय

जर कलाकंदचा वास हलका आणि नैसर्गिक वाटत असेल, तर तो शुद्ध आहे. पण खूप तीव्र सुगंध येत असेल, तर ते कृत्रिम फ्लेवरचं लक्षण असू शकतं. जर मिठाई अतिशय घट्ट आणि चिकट वाटत असेल, तर त्यात स्टार्च मिसळलेले असण्याची शक्यता असते.

लक्षात ठेवण्यासारखे

अनेकदा बाजारात कलाकंद तयार करताना डिटर्जंटसुद्धा मिसळले जाते, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतं. अशी मिठाई खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य बिघडते आणि पचनाच्या तक्रारी सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे मिठाई खाताना तिची शुद्धता तपासणे आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Milk Cake Adulteration: How to Identify Pure vs. Fake Kalakand?

Web Summary : Beware of adulterated milk cake (Kalakand) during Diwali! Check for artificial colors, strong smells, and excessive stickiness. Detergent is sometimes added, causing digestive issues. Ensure purity for good health.
टॅग्स :अन्नदिवाळी २०२५हेल्थ टिप्स