अधिक मासाचा महिना म्हटलं की घरोघरीच्या सासुबाईंचा आणि जावयाचा उत्साह बघण्यासारखा असतो. कारण या निमित्ताने लेक- जावई घरी येणार म्हणून सासूबाई आनंदून गेलेल्या असतात तर सासुरवाडीचा पाहुणचार मिळणार म्हणून जावईबुवाही खूश असतात. आता अधिक मासाला धोंड्याचा महिनाही म्हणतात (Adhik Maas 2026). कारण या महिन्यात जावयासाठी खास पुरणाचे धोंडे केले जातात. एरवी आपण पुरणाच्या पोळ्या खातो. पण अधिक मासाच्या महिन्यात मात्र पुरणपोळीसोबत पुरणाचे धोंडेही वाढले जातात. आता पुरणाचा अस्सल धोंडा तोच असतो जो बाहेरून छान कुरकुरीत लागतो तर आतून मऊसूत असतो. असा परफेक्ट धोंडा कसा करायचा ते आता पाहुया...(puranache dhonde recipe)
अधिक मास स्पेशल पुरणाचे धोंडे रेसिपी
साहित्य
१ वाटी कणिक
पाव वाटी बारीक रवा
उन्हाळी ट्रीपचे फोटो येतील कमाल, 'या' पद्धतीने त्वचेची काळजी घ्या, उन्हात फिरूनही टॅनिंग होणार नाही
१ चमचा तूप आणि थोडंसं मीठ
१ वाटी पुरण आणि धोंडे तळण्यासाठी तेल
कृती
धोंडे करण्यासाठी आपल्याला पुरण लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तर पुरण शिजवून घ्या.
यानंतर एका भांड्यात कणिक, रवा एकत्र करा. त्यात थोडंसं मीठ घाला. आता यानंतर तूप थोडं गरम करून वितळवून घ्या आणि ते कणिक- रव्यामध्ये घाला. सगळं मिश्रण हाताने एकत्र करून घ्या.
शुगर आहे, मग जेवण झाल्या झाल्या करा ‘हे’ १ काम, रक्तातील साखर कायम राहील नियंत्रणात
यानंतर थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्या. हे पीठ थोडं घट्ट मळावं. त्यानंतर ते १० मिनिटे झाकून ठेवा. यानंतर पुन्हा तेलाचा हात लावून ते थोडं मळून घ्या. पिठाचा एक मोठा गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटा. आता वाटीच्या साहाय्याने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करा.
या पुऱ्यांमध्ये पुरण भरून ते मोदकाप्रमाणे बंद करून घ्या आणि हाताने दाबून घ्या. हे झाले तुमचे धोंडे तयार. हे धोंडे तेलात तळून घेतले की तूप घालून जावयाला खायला द्या.. अधिक मासाचा धोंडा दणक्यात होऊन जाईल.
Web Summary : Adhik Maas celebrates the son-in-law with special puranache dhonde. The recipe involves preparing a dough with wheat flour, semolina, ghee, and salt, filled with sweet puran, shaped like dumplings, and deep-fried until golden and crispy. Serve hot with ghee.
Web Summary : अधिक मास में दामाद को विशेष पुरण के धोंडे खिलाए जाते हैं। गेहूं का आटा, सूजी, घी और नमक से आटा तैयार करें, फिर मीठे पुरण भरकर पकौड़ी जैसा आकार दें और सुनहरा होने तक तलें। घी के साथ गरमागरम परोसें।