इडली डोसा हे साऊथ इंडियन पदार्थ नाश्त्याला खायला सर्वांनाच आवडते. पण घरी केलेले पदार्थ बिघडतात अशी अनेकांची तक्रार असते. खासकरून उन्हाळ्यात घरी इडल्या करायच्या म्हटल्या की पीठ जास्तच आंबट होतं म्हणून बरेचजण घरी इडल्या करणं टाळतात. उन्हाळ्याच्या दिवसांत इडलीचं पीठ खूप लवकर आंबट होतं.
रात्रभर आंबवण्यासाठी ठेवलेलं पीठ सकाळी आंबट होतं आणि इडल्याची चव बिघडते. तुम्हालाही उन्हाळ्याच्या दिवसांत अशी समस्या येत असेल तर पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी सांगितला हा उपाय तुमचं काम सोपं होईल. यासाठी तुम्हाला महागड्या वस्तूची आवश्यकता नाही. फक्त १ पदार्थ वापरून तुम्ही परफेक्ट इडलीचं पीठ बनवू शकता. (Add This 1 Leaf To Idli Batter To Prevent Over Fermentation In Summer)
उन्हाळाच्या दिवसांत इडलीचं पीठ आंबट का होतं?
उन्हाळ्याच्या दिवसांत पदार्थ आंबण्याची क्रिया खूपच वेगानं होते. याच कारणमुळे इडली किंवा डोश्याचं बॅटर खूपच आंबट होतं. पीठ जास्त आंबू नये तसंच खूप आंबट लागू नये यासाठी सोपी ट्रिक वापरू शकता. न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी एक कमालीची ट्रिक सांगितली आहे. ज्यामुळे पीठ व्यवस्थित तयार होईल.
पीठ जास्त आंबट होऊ नये यासाठी देशी जुगाड कोणता?
न्युट्रिशनिस्ट श्वेता शाह सांगतात की तुम्ही बॅटर फर्मेंट करण्याआधी त्यात पान मिसळू शकता. ज्यामुळे पीठ आंबट होणं टाळता येतं. हा एक जुना घरगुती उपाय आहे. छोटं पानं पिठाची गुणवत्ता बदलू शकते.
बॅटरमध्ये पानं कसं मिसळावं
श्वेता शाह सांगतात की तुम्ही इडलीच्या बॅटरमध्ये अर्धा किंवा एक ताजं पानं मिसळू शकता. यासाठी अर्ध किंवा एक ताजं पान घ्या. स्वच्छ पाण्यानं धुवून नंतर हलकंस बारीक करून घ्या. नंतर ही पेस्ट इडलीच्या पिठात घालून व्यवस्थित मिसळा. नंतर बॅटर फर्मेंट करण्यासाठी ठेवा. आहारतज्ज्ञ सांगतात की हे पान पीठ आंबट होण्यापासून वाचवते तसंच पोटासाठीही उत्तम ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांत इडली किंवा डोश्याचं पीठ तयार करताना तुम्ही यात हे पानं घालायला विसरू नका.
Web Summary : Idli batter turns sour in summer? Nutritionist Shweta Shah suggests adding a leaf. This prevents over-fermentation, ensuring soft, delicious idlis. A simple, effective home remedy.
Web Summary : गर्मी में इडली बैटर खट्टा हो जाता है? पोषण विशेषज्ञ श्वेता शाह एक पत्ती मिलाने का सुझाव देती हैं। यह अति-किण्वन को रोकता है, नरम, स्वादिष्ट इडली सुनिश्चित करता है। एक सरल, प्रभावी घरेलू उपाय।