Join us

या हिवाळ्यात अभिनेत्री भाग्यश्रीच्या रेसिपीने डिंकाचे लाडू करून पाहा - बघा एकदम खास रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2024 18:01 IST

Actress Bhagyashree Shared Dink Ladoo Or Gond Ladoo Recipe: डिंकाचे लाडू करणार असाल तर एकदा अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेली ही रेसिपी ट्राय करून पाहा...(most simple method of making dink ladoo in winter)

ठळक मुद्देयंदा डिंकाच्या लाडूमध्ये तुम्हाला काही चव बदल हवा असेल तर भाग्यश्रीने सांगितलेली डिंकाच्या लाडूची ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहा..

आपल्याकडे ऋतूनुसार आहार बदलतो. बदलत्या ऋतूनुसार काही पदार्थ आवर्जून केले जातात तर काही पदार्थ खाणं कटाक्षाने टाळलं जातं. त्यानुसारच आता हिवाळा सुरू झाला आहे म्हटल्यावर घरोघरी डिंकाचे लाडू, मेथ्याचे लाडू, उडदाचे लाडू, सुकामेव्याचे लाडू करायला सुरुवात झाली आहे. थंडीतल्या लाडूंचे हे प्रकार सर्वसामान्यांच्या घरात जसे होतात, तसेच सेलिब्रिटींच्या घरातही होतात बरं का.. म्हणूनच तर थंडीचा कडाका वाढताच अभिनेत्री भाग्यश्री हिनेसुद्धा थंडी स्पेशल डिंकाचे लाडू करण्याचा घाट घातला आहे (Actress Bhagyashree shared dink ladoo or gond ladoo recipe for winter). तिने तिची रेसिपी सोशल मिडियावर शेअर केली असून ती खूपच सोपी आहे. म्हणूनच यंदा डिंकाच्या लाडूमध्ये तुम्हाला काही चव बदल हवा असेल तर भाग्यश्रीने सांगितलेली डिंकाच्या लाडूची ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहा..(most simple method of making dink ladoo in winter)

 

अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेली डिंकाच्या लाडूची रेसिपी

साहित्य

१ वाटी डाळवं किंवा भाजलेली हरबरा डाळ

१ वाटी मखाना

अर्धी वाटी डिंक

बटाट्याचे पराठे नेहमीचेच, 'आलू पिठा' खाऊन पाहा- बिहारच्या चवदार पारंपरिक पदार्थाची सोपी रेसिपी 

१ ते दिड चमचा तूप

२ ते ३ चमचे गूळ

बदाम काजूचे तुकडे प्रत्येकी १ चमचा

खारीक पावडर करणं अवघड वाटतं? १ सोपी ट्रिक- थंडीतल्या लाडूसाठी १५ मिनिटांत करा किलोभर पावडर 

अक्रोड आणि पिस्ताचे तुकडे प्रत्येकी १ चमचा 

१ टीस्पून मीरेपूड

१ टीस्पून ओवा

 

कृती

सगळ्यात आधी तर डाळवं आणि मखाना मिक्सरमधून बारीक करून घ्या.

त्यानंतर सुकामेव्याचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवून घ्या किंवा मग खलबत्यात कुटून घ्या. 

'हा' पदार्थ घ्या आणि दिवसातून एकदा चेहऱ्याला लावा! ७ दिवसांत दिसेल लक्षणीय बदल- त्वचा चमकेल

आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यात तूप टाकून डिंक तळून घ्या. तळून झालेला डिंक थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्या.

आता बारीक केलेलं सगळं साहित्य एका मोठ्या भांड्यात घ्या. त्यामध्ये ओवा आणि मीरेपूड टाका. तसेच गुळाची पावडर किंवा मिक्सरमधून फिरवून बारीक केलेला गुळ टाका. 

हे मिश्रण जर थोडं कोरडं वाटलं तर त्यात आणखी तूप टाका आणि त्याचे लाडू वळा. भाग्यश्रीने सांगितलेल्या रेसिपीने केलेले हे लाडू एकदा खाऊन बघाच.. 

 

टॅग्स :हिवाळ्यातला आहारअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.भाग्यश्री