पोळ्या, फुलके, भाकरी हे पदार्थ आपण रोजच करतो. कधी कधी त्यात बदल म्हणून मग पुऱ्या किंवा पराठे केले जातात. पण कधी कधी पोळ्या, फुलके, भाकरी आणि त्याच त्या चवीचे भाज्या घालून केलेले पराठे खाण्याचाही कंटाळा येतो. पुऱ्याही तेलकट असतात म्हणून नको वाटतात. म्हणूनच अशावेळी चवीत थोडा बदल हवा असेल तर चटपटीत अचारी पराठे करून पाहा. ही रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे (achari paratha recipe by chef Kunal Kapoor). रात्रीच्या जेवणात किंवा नाश्त्यालाही तुम्ही अचारी पराठे खाऊ शकता (how to make achari paratha?). दही, तूप, ठेचा यासोबत अचारी पराठे छान लागतात. शिवाय ते अगदी झटपट होतात.(healthy breakfast recipe)
अचारी पराठे करण्याची रेसिपी
गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ मिळून १ वाटी. तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाचेही अचारी पराठे करू शकता. किंवा मग गहू, ज्वारी, बेसन असे तिन्ही पीठ एकत्र करूनही करू शकता.
२ ते ३ टेबलस्पून लोणच्याचा खार आणि फोडी
१ टीस्पून मिरची आणि लसूण पेस्ट
केस जाड आणि लांब होण्यासाठी २ सोप्या टिप्स- केसांच्या सगळ्याच समस्या होतील कमी
१ टीस्पून जिरे पावडर
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ मध्यम आकाराचा कांदा
१ चमचा कसूरी मेथी
कृती
सगळ्यात आधी कांदा मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट करून घ्या.
एका मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घ्या. त्यामध्ये लोणच्याचा खार घाला. जर लोणच्यामध्ये कैरी किंवा लिंबाच्या फोडी असतील तर त्याही बारीक करून घाला.
रोज वापरून लाकडी पोळपाट- लाटणं काळं पडलं? ३ सोपे उपाय- नव्यासारखं स्वच्छ होईल
आता जिरेपूड, मीठ, कांद्याची पेस्ट, कोथिंबीर, कसूरी मेथी असं सगळं त्या पिठामध्ये घाला आणि हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या. मळून घेतलेलं पीठ ५ मिनिटे झाकून ठेवा.
त्यानंतर नेहमीप्रमाणे त्याचे पराठे लाटा आणि तव्यावर खमंग भाजून घ्या. गरमागरम अचारी पराठ्यांवर साजूक तूप लावून खा. चव आणखी छान लागेल.