Lokmat Sakhi >Food > कापून, चोखून की रस करून? उन्हाळ्यात आंबे खाण्याची योग्य पद्धत काय? वाचाल तर रहाल फायद्यात...

कापून, चोखून की रस करून? उन्हाळ्यात आंबे खाण्याची योग्य पद्धत काय? वाचाल तर रहाल फायद्यात...

Right way to eating mango : बरेच लोक या दिवसात आंबे खाण्यात एक चूक करतात. म्हणजे त्यांना आंबे खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:47 IST2025-04-28T12:39:51+5:302025-04-28T12:47:07+5:30

Right way to eating mango : बरेच लोक या दिवसात आंबे खाण्यात एक चूक करतात. म्हणजे त्यांना आंबे खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते.

According to Ayurveda expert what is right way to eating mango | कापून, चोखून की रस करून? उन्हाळ्यात आंबे खाण्याची योग्य पद्धत काय? वाचाल तर रहाल फायद्यात...

कापून, चोखून की रस करून? उन्हाळ्यात आंबे खाण्याची योग्य पद्धत काय? वाचाल तर रहाल फायद्यात...

Right way to eating mango : उन्हाळ्यात उन्हाचा जरी जास्त फटका बसत असला किंवा घामाघूम होत असाल, तरी उन्हाळा अनेकांना एका खास गोष्टीमुळे जास्त आवडतो. ती गोष्ट म्हणजे आंबा. कारण या दिवसातच गोड-आंबड, रसदार आंब्यांचा आनंद घेण्याची संधी मिळते. पिकलेल्या आंब्याचा रस असो वा कच्च्या आंबाच्या पन्ह काहीही लोकांना आवडतंच. आंब्याची टेस्ट मन हरवून टाकणारी तर असतेच सोबतच त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण बरेच लोक या दिवसात आंबे खाण्यात एक चूक करतात. म्हणजे त्यांना आंबे खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. बरेच लोक चुकीच्या पद्धतीने आंबे खातात आणि मग त्यांना वेगवेगळ्या समस्या होतात. 

रसदार, गोड आंब्यांचा आनंद घ्यायचा आहे आणि आरोग्यही चांगलं ठेवायचं असेल तर आंबे खाण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. अशात आयुर्वेद एक्‍सपर्ट डॉ. वारालक्ष्‍मी यांनी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत आंबे खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्यांनी सांगितलं की, बरेच लोक चुकीच्या पद्धतीने आंबे खातात ज्यामुळे त्यांना याचे फायदे कमी मिळतात आणि नुकसान जास्त होतं.
काय कराल?

आंबे आणल्यावर करायची पहिली बाब

बाजारातून आंबे विकत आणल्यावर सामान्यपणे अनेक लोक ते फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवतात. पण ही पद्धत चुकीची आहे. एक्सपर्टनुसार, आंबे खाण्याआधी कमीत कमी एक तास पाण्यात टाकून ठेवावे. आंबे गरम आणि जड असतात त्यामुळे त्यांना पाण्यात ठेवलं तर त्यांच्यात हलकेपणा येतो. तसेच यातील फायटिक अॅसिडही निघून जातं.

वेलची टाका

आंबे कापून खाण्यासाठी कापल्यावर ते तसेच खाऊ नका. त्यांवर वेलची पूड टाका. ज्या लोकांना आंब्याची एलर्जी आहे किंवा ज्यांना काही समस्या होते त्यांनी वेलची टाकून आंबे खावेत. याने उष्णता कमी होते आणि शरीराला थंड वाटतं.

कसे खावेत?

बरेच लोक स्वच्छतेच्या कारणाने किंवा हात चिकट होऊ नये म्हणून आंबे काट्याच्या चमच्याने खातात. पण आंबे नेहमी हाताने खावेत. असं केल्याने आंबे डायजेस्ट करण्यास मदत मिळते. त्यासोबतच आंबे कधीही शेक किंवा रसाच्या स्वरूपात खाण्यापेक्षा कापूनच खावेत. पूर्ण फळ खावं. याने तुम्हाला याचे फायदे जास्त मिळतील.

Web Title: According to Ayurveda expert what is right way to eating mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.