Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > सध्या जो तो पितोय व्हायरल ABC ज्यूस, असतं काय ते आणि खरंच पोटाला चांगलं की डोक्याला ताप?

सध्या जो तो पितोय व्हायरल ABC ज्यूस, असतं काय ते आणि खरंच पोटाला चांगलं की डोक्याला ताप?

ABC Juice : हे एबीसी ज्यूस काय आहे, त्यात काय काय टाकतात आणि त्यापासून कोणते फायदे मिळतात हे आज आपण पाहणार आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:33 IST2026-03-16T13:16:25+5:302026-03-16T13:33:13+5:30

ABC Juice : हे एबीसी ज्यूस काय आहे, त्यात काय काय टाकतात आणि त्यापासून कोणते फायदे मिळतात हे आज आपण पाहणार आहोत. 

ABC Juice : How to make ABC juice and what benefits you gain from it | सध्या जो तो पितोय व्हायरल ABC ज्यूस, असतं काय ते आणि खरंच पोटाला चांगलं की डोक्याला ताप?

सध्या जो तो पितोय व्हायरल ABC ज्यूस, असतं काय ते आणि खरंच पोटाला चांगलं की डोक्याला ताप?

ABC Juice : उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या फळांचे किंवा भाज्यांचे ज्यूस पितात. या ज्यूसमधून शरीराला भरपूर पोषणही मिळतं. व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडेंटमुळे हे वेगवेगळे ज्यूस आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. अशात हल्ली एक एबीसी ज्यूस चांगलंच लोकप्रिय ठरत आहे. हे एबीसी ज्यूस काय आहे, त्यात काय काय टाकतात आणि त्यापासून कोणते फायदे मिळतात हे आज आपण पाहणार आहोत. 

काय असतं एबीसी ज्यूस? 

ABC ज्यूस हे अॅपल, बीट आणि कॅरेट या तीन गोष्टी मिक्स करून तयार केलं जातं. यात व्हिटामिन ए, सी, के, आयर्न, पोटॅशिअम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे ज्यूस बनवण्यात १ सफरचंद, एक छोटं बीट आणि २ गाजर सोलून छोटे तुकडे करा. यात थोडं आलं आणि अर्धा कप पाणी टाकून ब्लेंड करा. आता ज्यूस गाळून त्यात थोडा लिंबाचा रसा आणि काळं मीठ घाला. आपलं एबीसी ज्यूस तयार आहे. 

एबीसी ज्यूस पिण्याचे फायदे

बॉडी डिटॉक्स - सफरचंद, बीट आणि गाजराचा ज्यूस बॉडी डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. यातील अँटी-ऑक्सिडेंट शरीरातून विषारी तत्व बाहेर काढतं.

त्वचेसाठी फायदेशीर - या ज्यूसमध्ये व्हिटामिन ए, सी आणि आयर्न असतं. ज्यामुळे त्वचा डिटॉक्सिफाय होऊन डाग दूर होतात, पिगमेंटेशन सुधारतं आणि नॅचरल ग्लो मिळू शकतो. यातील अँटी-ऑक्सिडेंट आणि बीटा कॅरोटीनने त्वचेत कोलेजन वाढतं, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

रक्त वाढतं - एबीसी ज्यूसमध्ये आयर्न, फोलेट आणि व्हिटामिन सी असल्याने हीमोग्लोबिन वाढण्यास आणि अॅनीमियासोबत लढण्यास मदत मिळते. तसेच तिन्ही फळांच्या मिश्रणाने रेड ब्लड सेल्सही वाढतात.

पचनक्रिया सुधारते - एबीसी ज्यूसमधील फायबर आणि पोषक तत्वांनी पचन तंत्र सुधारतं. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत मिळते. विषारी तत्व बाहेर पडल्याने पचनक्रिया अधिक चांगले होते. 

इम्यूनिटी वाढते - व्हिटामिन आणि अँटी-ऑक्सिडेंट असलेल्या या ज्यूसने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. ज्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांचा धोका कमी होतो.

Web Title : एबीसी जूस का क्रेज: फायदे, रेसिपी और यह ट्रेंड क्यों कर रहा है

Web Summary : एबीसी जूस (सेब, चुकंदर, गाजर) एक लोकप्रिय स्वास्थ्य पेय है, जो विटामिन और एंटीऑक्सिडेंट से भरपूर है। यह डिटॉक्स करता है, त्वचा को बेहतर बनाता है, खून बढ़ाता है, पाचन में मदद करता है और प्रतिरक्षा को मजबूत करता है। रेसिपी में अदरक, नींबू और काला नमक मिलाकर सामग्री को ब्लेंड करना शामिल है।

Web Title : ABC Juice Craze: Benefits, Recipe, and Why It's Trending

Web Summary : ABC juice (apple, beet, carrot) is a popular health drink, packed with vitamins and antioxidants. It detoxifies, improves skin, boosts blood, aids digestion, and strengthens immunity. Recipe includes blending the ingredients with ginger, lemon, and black salt.