Garlic Chutney Recipe: जेवणाची टेस्ट वाढवण्यासाठी काहींना तिखट मिरची आवडते, तर काहींना चटपटीत चटणीशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. जर तुम्हालाही स्पायसी खाण्याचा शौक असेल, तर ही लसणाची तिखट लाल चटणी नक्की करून बघा. तिचा सूगंध आणि चव दोन्हीही जेवणाला एक वेगळाच टच देतात.
आवश्यक साहित्य
वाळलेल्या लाल मिरच्या – 30 ते 40 ग्रॅम
लसूण पाकळ्या – 70 ते 80 ग्रॅम
मोहरीचं तेल – अर्धा कप
जिरे – 1 मोठा चमचा
मीठ – चवीनुसार
आमचूर पावडर – 2 लहान चमचे
कृती
मिरच्या भिजवणे
वाळलेल्या लाल मिरच्यांना 3–4 तास पाण्यात भिजत ठेवा. वेळ कमी असेल तर कोमट पाणी वापरू शकता.
पेस्ट तयार करणे
मिरच्या मऊ झाल्यावर त्यातील पाणी काढून टाका. मिक्सरमध्ये या मिरच्या आणि लसूण पाकळ्या एकत्र घालून जाडसर पेस्ट तयार करा.
फोडणी तयार करणे
कढईत मोहरीचं तेल गरम करा. त्यात जिरे टाका आणि ते सोनेरी होईपर्यंत परता.
चटणी शिजवणे
आता त्यात तयार केलेली लाल मिरची-लसूण पेस्ट घाला आणि मंद आचेवर परता. चटणी थोडी तेल सोडू लागली की त्यात मीठ आणि आमचूर पावडर घाला. सगळं मिश्रण नीट एकजीव होईपर्यंत शिजवा.
थंड होऊ द्या
चटणी तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि ती थंड होऊ द्या.
सर्व्हिंग व स्टोरेज टिप्स
ही लसूणाची चटणी रोटी, पराठा, भात किंवा भाजीसोबत अप्रतिम लागते. ती एअरटाइट डब्यात भरून काही दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. जास्त दिवस टिकवायची असल्यास वरून थोडं मोहरीचं तेल घालून झाकण लावा.
