मसाले भात, टोमॅटो भात नेहमीच करता या वेळी काहीतरी वेगळा पदार्थ म्हणून तोंडली भात करुन पाहा. चवीला फार मस्त लागतो. (A simple, authentic Marathi recipe for Tondli Bhaat - less preparation, delicious food)तोंडलीची भाजी अनेकांना आवडत नाही मात्र एकदा हा भात खाऊन बघा. तोंडलीची चव या भातामध्ये काही वेगळीच लागते. अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करुन पाहा.
साहित्य
तोंडली, तांदूळ, वांग, मीठ, हळद, कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, कडीपत्ता, तमालपत्र, गरम मसाला, गोडा मसाला, तूप
कृती
१. तोंडलीचे लांब-लांब तुकडे करुन घ्या. (A simple, authentic Marathi recipe for Tondli Bhaat - less preparation, delicious food)कांद्याही लांब पातळ असा चिरुन घ्या. टोमॅटोचे लांब तुकडे करा. गावठी वांगी वापरली तर चव आणखी मस्त लागेल. वांग्याचे लांब काप करुन घ्या. इतरही कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील तर त्याही वापरा.
२. एका कुकरमध्ये थोडे तूप घाला. त्यावर मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे घाला. जिरे छान फुलू द्या मग त्यामध्ये कडीपत्ता घाला. तमालपत्र घाला आणि मस्त परतून घ्या.
३. फोडणी खमंग परतल्यावर त्यात कांदा घालायचा आणि खमंग परतायचा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यामध्ये वांग्याचे काप घालायचे. वांगे मस्त परतायचे. शेवटी टोमॅटो घालायचा आणि सगळ्या भाज्या मस्त परतायच्या.
४. भाज्या परतल्यावर त्यात गरम मसाला घाला. त्यात गोडा मसाला घाला. मीठ घाला. सगळे मसाले मस्त परता मग त्यात पाणी घाला जास्त पाणी घालू नका.
५. भाज्या जरा खमंग झाल्यावर त्यामध्ये धुतलेले तांदूळ घाला. जरा वेळ उकळू द्या. उकळल्यावर त्यात मोकळा भात होईल एवढेच पाणी घाला आणि झाकण लावून टाका.
६. जास्त शिट्या काढू नका. भात पचपचीत मऊ करु नका. मोकळा छान होईल याची काळजी घ्या.
साध्या भाताऐवजी बिर्याणीचा तांदूळही वापरु शकता. त्याची चव जास्त छान लागते. शिवाय तो भात अगदी मोकळाही होतो. तसेच त्यात गाजर वापरू शकता. तसेच मटार छान लागतात. कोथिंबीर घालू शकतो. फोडणीमध्ये लसूण घालू शकता. ठराविक पदार्थच वापरायचे असे नाही तुम्हाला जे काही आवडते ते भातामध्ये घालू शकता.