असे अनेक पदार्थ आहेत जे आपण रोज स्वयंपाक करताना वापरतो. हळद, मीठ , तिखट असे पदार्थ नेहमी वापरले जातात. फोडणी तयार करताना आपण त्यात हिंग घालतो. (A pinch of asafoetida is a boon for the stomach! Don't forget to add asafoetida in your food, see 5 reasons, health tips )अनेक जण हिंग घालायचे टाळतात. कारण अनेकांचा असा समज आहे की हिंग फक्त चांगला सुगंध यावा यासाठी पदार्थात घातले जाते. मात्र मुळात तसे नसून हिंग वापरण्यामागे आणखी एक कारण असते. ते कारण म्हणजे हिंगामुळे पचनाची प्रक्रिया सुलभ होते. पोट साफही होते आणि कितीही जड पदार्थ असला तरी पचायला मदत होते.
हिंगात अनेक गुणधर्म असतात. हिंगामधील मुख्य गुणधर्म पचनास मदत करणारे असतात. हिंगामुळे अपचन होत नाही. तसेच पोट फुगण्याचा त्रास ज्याला आपण ब्लोटींग म्हणतो, त्यावर हिंग एक रामबाण उपाय आहे. फोडणीत हिंग घातल्यावर फोडणीतील इतर पदार्थांमुळे होणारे पित्ताचे आणि उष्णतेचे त्रास टाळता येतात. विविध डाळी आपण खातो. डाळ पौष्टिक जरी असली तरी ती पचायला जरा जड असते. मात्र वरण किंवा आमटी करताना फोडणीत हिंगही घातले. तसेच डाळ शिजायला लावताना त्यात थोडे हिंग घातले की डाळ पटकन पचते.
हिंगामध्ये अँण्टीबॅक्टेरियल आणि अँण्टीफंगल गुणधर्मही असतात. जे शरीरातील विषारी घटक शरीरातून काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे रोजच्या आहारात थोडा हिंग वापरणे शरीरासाठी उपयुक्त ठरते. शिवाय, हिंगामुळे घशाशी खवखवणाऱ्या पदार्थांचा प्रभावही कमी होतो. हिंग आहारात असणे म्हणून गरजेचे आहे. हिंगात कॅरेटीन असते तसेच त्यात लोह असते. फॉस्परस, कॅल्शियम असते. वाताचा त्रास असेल तरी हिंगामुळे आराम मिळतो. पोट डब्ब झाल्यावर किंवा गॅसेस झाल्यावर आई पाण्यात हिंग मिसळून ते पोटाला लावायची. हा उपाय सगळ्यांनीच लहानपणी केला असेल.नाभीभोवती हिंग चोळल्यामुळे गॅसेस लवकर पास होतात.
एकंदरीत फोडणीत हिंग घालायला अजिबात विसरु नका. हिंग फक्त सुगंधासाठी किंवा चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी गरजेचे असते. त्यामुळे चटपटीत, चमचमीत आणि झणझणीत काहीही करताना त्यात चिमूटभर हिंग घालायला विसरु नका.