तुम्हालाही गोड पदार्थ आवडतात? पण मग वजनाचं काय? केक खाल्ला तर झटकन वजन वाढेल, पण पटकन कमी होणार नाही. (A cake that will not make you gain weight even if you eat it regularly)या भीतीने खाता येत नाही. केक जेवढा चविष्ट लागतो, त्याहून खुप जास्त शरीरासाठी हानिकारक असतो. त्यात पौष्टिक असं काहीच नसतं. त्यात फक्त भरपूर फॅट्स असतात. केक जर हेल्दि तयार करता आला तर ? येतो ना. नक्कीच पौष्टिक केक तयार करता येतो. (A cake that will not make you gain weight even if you eat it regularly)चवीला तर अप्रतिमच लागतो. आजकाल वजन कमी करण्यासाठी लोकं रागी खातात. आपणही रागी फूड्स वगैरे ऐकून एकदम काहीतरी वेगळं समजतो. रागी म्हणजे दुसरं काही नसून नाचणीचं पीठ असतं. चला मग तयार करूया हेल्दि रागी केक. म्हणजेच नाचणीचा केक.
साहित्य: (A cake that will not make you gain weight even if you eat it regularly)नाचणीचे पीठ, गूळाची पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर, दूध, तूप, डार्क चॉकलेट
लहान केकच्या अंदाजाने प्रमाण घ्या. फार मोठा केक तयार करायला जाऊ नका. प्रमाण १ वाटी नाचणीअर्धी वाटी गूळ पावडर१ चमचा बेकिंग सोडापाव वाटी कोको पावडरपाव ते अर्धी वाटी दूध १ चमचा तूप
कृती: १. एका भांड्यात नाचणीचे पीठ घ्या. त्यात अर्धी वाटी गूळ पावडर घाला. त्यात १ चमचा बेकिंग सोडा घाला.
२. पाव वाटी कोको पावडर घ्या. गोड वापरू नका. झीरो शुगर वापरा. सगळं मस्त मिक्स करून घ्या.
३.पाव ते अर्धी वाटी दूध घ्या. बॅटर अति पातळ करायचे नाही. त्यानुसार दूध वापरा. सगळं छान कालवून घ्या. त्यात तूप घाला.
४. आता ओव्हनमध्ये केक तयार करून घ्या. जर ओव्हन नसेल काहीच हरकत नाही. कुकरच्या तळात मीठ ओता. त्यावर ताटली ठेवा. त्यावर केकचं भांड ठेवा आणि झाकण उलट ठेवा. केक छान शिजू द्या.
५. डार्क चॉकलेट वितळवून घ्या. आणि केकच्या वर घाला.
हेल्दि केक तयार आहे. खा आणि मज्जा करा. लहान मुलांना तर कळणारंही नाही की, केक आहे की पौष्टिक पदार्थ.