सणासुदीला आपल्या प्रत्येकाच्याच घरी पंच पक्वान्नाचा (Cooking Tips) स्वयंपाक केला जातो आणि छान छान पदार्थ बनवले जातात. जेवणाचा मेन्यू काहीही असला तरी एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे पापड. वरण भातासोबत किंवा पुरी भाजीसोबत कुरकुरीत पापड खायला खूपच छान वाटतं. (5 Tips To Keep Papad Crispy)
पण पापड वातड होतात, पापडांचा कुरकुरीतपणा कमी होतो खूपच तेलकट होतात अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. पापड तळून ठेवले की लगेच वातड होतात (Kitchen Hacks). नरम झालेले पापड खायला चांगले लागत नाहीत कोणाला वाढताही येत नाही. अशावेळी ते फेकून द्यावे लागतात पापड वातड होऊ नये म्हणून काही सोप्या टिप्स पाहूया. (How To Keep Papad From Getting Soggy)
पापड लगेच का नरम पडतात?
पापड नीट न तळल्यामुळे नरम पडतात. तेलाचं तापमान किती आहे, पापड कोरडा आहे की नाही हे सुद्धा महत्वाचं असतं. ओल्या हवेच्या संपर्कात आल्यानं, तसंच व्यवस्थित बंद डब्यात न ठेवल्यामुळे पापड नरम पडतात.
पापड व्यवस्थित राहण्यासाठी खास टिप्स
१) व्यवस्थित तळा- पापड तळताना तेल पुरेसं गरम आहे की ते तपासा. तेल कमी गरम असेल तर पापड नीट फुलत नाही आणि कच्चा राहतो. तेल जास्त गरम असेल तर पापड लगेच लाल-काळपट होतो. म्हणून मध्यम आचेवर पापड तळा.
सणासुदीला पांढरे केस बरे नाही दिसत? नारळाच्या तेलात 'हा' पदार्थ कालवून लावा, ५ मिनिटांत केस काळेभोर
२) हवाबंद डब्यात ठेवा- तळलेले पापड लगेच खाणार नसाल तर कोणत्याही हवाबंद डब्यात ठेवा. कारण हवा लागून लगेच पापड नरम होतील. शक्य असल्यास डब्यात ठेवण्याआधी छोट्या पिशवीमध्ये ठेवा त्यात १ चमचा साखर घाला त्यामुळे हवा शोषली जाईल आणि पापड कुरकुरीत राहील.
३) मायक्रोव्हेव्हमध्ये गरम करा- तळलेले पापड नरम झाले असतील तर मायक्रोव्हेव्हमध्ये सेफ प्लेटमध्ये ठेवून फक्त १५ ते २० सेकंद गरम करा ज्यामुळे पापड पुन्हा कुरकुरीत होतील.
४) फ्रिजमध्ये साठवा- जर जास्त पापड असतील आणि जास्तवेळ ठेवायचे असतील तर हवाबंद पिशवीत किंवा डब्यात ठेवून मग फ्रिजमध्ये ठेवा. ज्यामुळे जास्तवेळ ताजे राहतील.
रोज दोनदा भात खाल्ला तरी ना शुगर वाढेल ना वजन; डॉक्टर सांगतात भात 'असा' शिजवा...
५) ऊन दाखवा- जर तुम्ही घरीच पापड करत असाल तर व्यवस्थित सुकू द्या. पापड जितके कोरडे राहतील तितके जास्त चांगली राहतील. २ ते ३ दिवस कडक उन्हात ठेवा. पापड कडक नसतील तळल्यानंतर लगेच नरम पडतात.