गुलाबजाम हा अनेक जणांचा आवडीचा पदार्थ. ज्या लोकांना फारसं गोड खायला आवडत नाही त्यांनाही गुलाबजाम मनापासून आवडतात. म्हणूनच दिवाळीच्या दिवसांमध्ये जर गुलाबजाम करण्याचा विचार करत असाल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स नक्कीच लक्षात ठेवा. बऱ्याचदा गुलाबजामचा पाक जास्त घट्ट होतो त्यामुळे ते कडक होतात, तर कधी चांगले तळले गेले नाहीत म्हणून अगदीच मऊ पडतात. यासाठीच गुलाबजाम करताना कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कुठल्या टाळायला पाहिजेत ते पाहूया (5 Tips To Make Gulab Jamuns That Don't Turn Hard)
गुलाबजाम करताना काय काळजी घ्यावी?
१. गुलाबजाम खव्याचे करा किंवा विकत आणलेल्या पिठाचे करा... आपण पोळ्या करण्यासाठी कणिक ज्या पद्धतीने भरपूर मळून घेतो त्या पद्धतीने गुलाबजामचे पीठ कधीही मळू नका. या पिठाला खूप जास्त मळण्याची गरज नसते.
जुन्या, टाकाऊ बाटल्यांपासून करा सुंदर, आकर्षक दिवे- बघा सोपी युक्ती, दिवाळीत उजळेल घर
२. गुलाबजामचे छोटे छोटे गोळे करताना काळजी घ्या. दोन्ही तळहातांना तूप लावून व्यवस्थित गोलाकार करून घ्या. जर हे गोळे व्यवस्थित तुम्ही एकजीव केले नाही तर ते तळताना फुटू शकतात किंवा एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात. त्यांच्यातला घट्टपणा निघून जाऊ शकतो.
३. गुलाबजाम नेहमी मंद ते मध्यम आचेवरच तळायला हवेत. गॅस मोठा केला तर गुलाबजाम बाहेरच्या बाजूने तळल्यासारखा दिसतो पण आतून तो कच्चा असतो.
४. गुलाबजाम तळून झाल्यानंतर ते लगेचच गरम पाकामध्ये टाका. काही जणी ते उकळत असलेल्या पाकात घालतात. असं करू नये. थंड किंवा उकळत्या पाकात गुलाब जाम घालू नये. पाक चांगला मुरत नाही.
५. खव्याचे गुलाबजाम करत असाल तर खवा आणि मैदा किंवा खवा आणि रवा यांचे प्रमाण अगदी व्यवस्थित हवे. ते चुकले तर गुलाबजामही बिघडतात.