Lokmat Sakhi >Food > कोणत्या डाळींमध्ये असतं सगळ्यात जास्त प्रोटीन? शाकाहारी जेवणातूनही मिळेल जबरदस्त ताकद रोज

कोणत्या डाळींमध्ये असतं सगळ्यात जास्त प्रोटीन? शाकाहारी जेवणातूनही मिळेल जबरदस्त ताकद रोज

High Protein Rich Pulses : जे लोक शाकाहारी असतात त्यांना प्रोटीन मिळवण्यासाठी काय खावं? असा प्रश्न अनेकदा पडत असतो. अशात आज आम्ही तुम्हाला पाच अशा डाळींबाबत सांगणार आहोत ज्यात भरपूर प्रोटीन असतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:38 IST2024-12-21T11:10:01+5:302024-12-21T14:38:44+5:30

High Protein Rich Pulses : जे लोक शाकाहारी असतात त्यांना प्रोटीन मिळवण्यासाठी काय खावं? असा प्रश्न अनेकदा पडत असतो. अशात आज आम्ही तुम्हाला पाच अशा डाळींबाबत सांगणार आहोत ज्यात भरपूर प्रोटीन असतं.

5 protein-rich pulses that are perfect for any season | कोणत्या डाळींमध्ये असतं सगळ्यात जास्त प्रोटीन? शाकाहारी जेवणातूनही मिळेल जबरदस्त ताकद रोज

कोणत्या डाळींमध्ये असतं सगळ्यात जास्त प्रोटीन? शाकाहारी जेवणातूनही मिळेल जबरदस्त ताकद रोज

High Protein Rich Pulses : वेगवेगळ्या डाळी आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग असतात. लोक डाळींचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. डाळी चवीला तर चांगल्या लागतातच, सोबतच त्यांमधून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. पण जे लोक शाकाहारी असतात त्यांना प्रोटीन मिळवण्यासाठी काय खावं? असा प्रश्न अनेकदा पडत असतो. अशात आज आम्ही तुम्हाला पाच अशा डाळींबाबत सांगणार आहोत ज्यात भरपूर प्रोटीन असतं.

मसूरची डाळ

मसूरची डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. प्रोटीनसाठी मसूरची डाळ तुम्ही सालीसोबत किंवा सालीशिवायही खाऊ शकता. मसूरच्या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन बी२, फोलिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम असे पोषक तत्वही भरपूर असतात.

तूर डाळ

तूर डाळीमध्येही प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्याशिवाय या डाळीमध्ये फायबर फोलिक अ‍ॅसिड, आयर्न आणि कॅल्शिअमही भरपूर असतं. ही डाळ रोज खाल्ल्याने शरीरातील प्रोटीन वाढतं. तसेच तूर डाळीच्या सेवनाने डायबिटीस आणि हृदयरोग कंट्रोल करण्यासही मदत मिळते. इतकंच नाही तर तूर डाळीचं पाणी प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते.

चण्याची डाळ

चण्याची डाळ प्रोटीनने भरपूर असते. तसेच ही डाळ खाल्ल्याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. प्रोटीनसोबतच या डाळीमध्ये फायबरही भरपूर असतं, ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि पोटही साफ राहतं. इतकंच नाही तर चण्याच्या डाळीने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. तसेच या डाळीने शरीरात लाल रक्तपेशी वाढण्यासही मदत मिळते. 

मूग डाळ

तूर डाळीनंतर मूग डाळ ही सगळ्यात फायदेशीर मानली जाते. ही डाळ खाल्ल्याने  शरीराला प्रोटीन तर मिळतंच, सोबतच तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. मूग डाळी पचायला हलकी असल्याने पोटाच्या अनेक समस्याही दूर होतात. तसेच या डाळीने शरीरात ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं.

उडीद डाळ

उडीद डाळ अनेक दृष्टीने शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन बी सुद्धा भरपूर असतं. जर प्रोटीनची कमतरता दूर करायची असेल तर या डाळीचा रोजच्या आहारात समावेश करावा. तसेच या डाळीमध्ये फोलिक अ‍ॅसिड, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्वही भरपूर असतात. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र मजबूत राहतं.

Web Title: 5 protein-rich pulses that are perfect for any season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.