Join us  

कोजागरीला मसाला दूध पिण्याचे ५ फायदे, परंपरेत आहेत आरोग्याचे खास वरदान, मनही होईल शांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2023 9:00 AM

5 benefits of drinking masala milk to Kojagari : कोजागरी निमित्त मसाला दूध पिताय ? चवदार, पौष्टिक मसाला दूध पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे...

शरद ऋतूमध्ये येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima Milk) म्हणतात. यावेळी पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते. वातावरणात बदल होतं असतात. अशावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते. ही ताकद म्हणजे कॅल्शिअम आपल्याला दुधातून भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार, कोजागरी पौर्णिमेला दुध (Masala Milk) किंवा दूग्धजन्य पदार्थ खाण्या - पिण्याची पद्धत प्रचलित आहे. याशिवाय दुधात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याचे दुधाचे औषधी गुणधर्म अधिक वाढतात. असे पौष्टिक व चवदार मसाले दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध, खीर किंवा दूग्धजन्य पदार्थ खाणे अधिक पसंत केले जाते(5 benefits of drinking masala milk to Kojagari).

आपल्याकडे सणांच्या दिवशी घेतल्या जाणाऱ्या विविध आहाराला देखील विशेष महत्व असते. एखाद्या सणाला उपवास, तर एखाद्या सणाला गोड पदार्थांची मेजवानी असते. हे सण त्या वेळच्या वातावरणातील बदलांशी संबंधित असतात. कोजागरीला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असतो. ज्यामुळे रात्रीच्या वेळी चंद्राचे संपूर्ण रूप पाहाता येतं. या दिवशी पडणारा चंद्राचा प्रकाश आरोग्यासाठी उत्तम असतो असे म्हटले जाते. यासाठीच रात्रीच्या वेळी चंद्राचे दर्शन घेत मसाले दुधाचा (Masala Milk) आस्वाद घेत रात्र जागवण्याची पद्धत आहे. कोजागरी पौर्णिमेला (Why Masala Doodh Is The Best Energy Drink) आपल्याकडे विशेष महत्व असते, याचबरोबर मसालेदूध पिण्यालाही तितकच आरोग्यदायी महत्त्व आहे. कोजागरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याचे नेमके कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते पाहूयात(5 health benefits of drinking masala milk).

मसाला दूध पिण्याचे नेमके फायदे कोणते ? 

१. रोगप्रतिकारक शक्ती वाढते :- कोजागरीला शितल चंद्रप्रकाशातील दूध पिणं शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. या सणाला आटीव मसाला दूध पिण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या काळात पावसाळा संपून थंडीला सुरूवात होत असते. वातावरणात होणाऱ्या बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. म्हणूनच आजारपणांपासून दूर राहण्यासाठी मसाला दूध पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं.

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : ‘मसाला दूध’ बनवण्याची सोपी रेसिपी, फक्त ४ सोप्या स्टेप्स आणि कोजागरीसाठी व्हा रेडी...

२. चांगली झोप लागते :- कोजागरीला रात्री झोपण्यापूर्वी मसाले दूध प्यायलात तर आपल्याला शांत झोप लागू शकते. याशिवाय रोज रात्री झोपताना हळदीचे किंवा मसाला दूध पिण्याने नक्कीच चांगली झोप लागते.

कोजागरी स्पेशल : मसाला दूध छान घट्ट होण्यासाठी ६ सोपे झटपट पर्याय, मसाला दूध होईल मस्त...

३. वजनावर नियंत्रण राहते :- रात्री झोपताना हळदीचे दूध किंवा मसाला दूध पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण रात्री झोपताना दूध प्यायल्यामुळे आपल्याला सकाळी लवकर भूक लागत नाही. ज्यामुळे आपण सकाळी उठल्या उठल्या चुकीचे अन्नपदार्थ खाणे टाळतो किंवा कमी प्रमाणात खातो.

४. कॅल्शियमची कमतरता भरुन निघते :- दूधात कॅल्शियमचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. कॅल्शियम आपले दात आणि हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचे असते. जर आपल्याला हाडांच्या किंवा  दातांच्या समस्या वारंवार होत असतील तर आहारात दूधाचा जरूर समावेश करावा. कोजागरीच्या रात्री मसाला दूध यासाठीच पिणे फायदेशीर ठरू शकते. ज्यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन - डी आणि कॅल्शियमची गरज भरून निघते.      

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : विकतचा महागडा मसाला आणण्यापेक्षा घरीच करा दूध मसाला, मिळेल परफेक्ट पारंपरिक चव...

५. मानसिक स्वास्थ चांगले राहते :-कोजागिरीच्या रात्री आजूबाजूचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि उत्साही असते. अशावेळी चंद्रप्रकाशातील मसाले दूधाचा नैवेद्य घेतलेल्यामुळे तुमचे मन प्रसन्न होते. मानसिक ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी कोजागरीला मसाले दूध जरूर प्या.

टॅग्स :अन्नफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सकोजागिरी