Join us

चहा पिऊन पित्त वाढतं ? ४ प्रकारचे ‘हे’ चहा प्या, तब्येतीसाठीही उत्तम-चहाही सोडायला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 19:58 IST

4 types of Drinks which will fulfill your tea cravings : चहा म्हणजे विषच. त्याऐवजी प्या ही प्येये.

असं म्हणतात, "चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवाच." काही चुकीचं सांगत नाहीत डॉक्टर, चहा म्हणजे व्यसनच आहे. काही लोकांची चहाची वेळ उलटून गेली आणि चहा मिळाला नाही तर, चिडचिड व्हायला लागते. ( 4 types of Drinks which will fulfill your tea cravings )चहाची मुळात भारतीयांना सवय लागली आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशाची भोजन पद्धती भिन्न आहे. प्रत्येक प्रदेशाच्याच काय तर, गावोगावी अन्नात वैविध्य आढळून येते. संध्याकाळी मात्र चारच्या ठोक्याला  प्रत्येक घरातून चहाचा सुगंध घुमायला लागतो. ( 4 types of Drinks which will fulfill your tea cravings ) चहा सगळ्यांच्या घरात तयार होतोच. पण एवढा चहा पिणे शरीरासाठी चांगले नाही. चहाला 'स्लोकीलर' किंवा 'विष' असं डॉक्टर म्हणतात. पण 'दिल है के मानता नही'. चहा हवाच. तर मग चहा जरा वेगळ्या पद्धतीने तयार करून बघूया का? नाही.. नाही.. तुम्हाला ग्रीन टी प्यायला सांगत नाही. मान्य आहे फार कडू लागते.आपल्या देशी पद्धतीनेच चहाची तलप घालविण्याचे उपाय पाहूया.

रेग्युलर चहाऐवजी ही प्येये पिऊ शकतो.( 4 types of Drinks which will fulfill your tea cravings )

१. आले-लिंबाचा चहाआले-लिंबाचा चहा जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहात, तर नक्कीच चांगला. चहाची तलपही घालवतो आणि फ्रेश होण्यातही मदत करतो. १.आलं घालून पाणी उकळून घ्या. त्यात चहाची पात, तुळशीची पाने आणि थोडी चहा पावडर घाला. अति घातली की तो कडू होतो. २. चहा पावडर घातल्यावर जास्त उकळू नका. ३. कपात मध घ्या. त्यात चहा गाळून घ्या. आणि प्या.

२. जास्वंदाचा चहामान्य आहे याला चहा म्हणू शकत नाही. पण एकदा पिऊन बघा नक्की आवडेल. जास्वंदाचे फुल फार औषधी असते. १. जास्वंदाची फुले स्वच्छ धुवून घ्या. २. पाण्यात घालून उकळा. पाण्याचा रंग लाल होऊ द्या. ३. एका कपात मध घ्या. त्यात लिंबू पिळा आणि मग चहा गाळून ओता. ४. गरम गरम प्या. 

३. ब्लॅक कॉफी ब्लॅक कॉफी शरीरासाठी चांगली. तिच्यात हानिकारक असे काही  नाही. बरेच जण ब्लॅक कॉफी पिताना दिसतात. शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी अशी कॉफी चांगली.१. गरम पाणी करून त्यात कॉफी घाला. गाळा आणि प्या. 

४. गोकर्णाचा चहागोकर्णाच्या फुलांपासून चहा पावडर तयार करून ती ब्लू टी म्हणून बाजारात महाग विकली जाते. पण हे गोकर्ण आपल्या भारतातल्या गावागावात सापडतं.

१. गोकर्णाची फुले धुवून घ्या.२. पाण्यात उकळून घ्या. पाणी निळे होईपर्यंत उकळा. हे फुल कडू वगैरे लागत नाही.३. त्यात हवं तर थोडं मध घाला आणि प्या.  

टॅग्स :अन्नआरोग्यआहार योजना