Lokmat Sakhi >Food > तळणीचे मोदक तळताना कढईतच फुटतात? ४ टिप्स- सारण बाहेर येऊन तेल खराब होणार नाही 

तळणीचे मोदक तळताना कढईतच फुटतात? ४ टिप्स- सारण बाहेर येऊन तेल खराब होणार नाही 

4 Tips For Frying Modak During Ganpati Festival 2025: तळणीचे मोदक तळणं अनेकजणींना खूप अवघड जातं. म्हणूनच त्यावरचे हे काही खास उपाय पाहा..(why do modak get burst in kadhai while frying?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 13:15 IST2025-08-26T13:14:41+5:302025-08-26T13:15:36+5:30

4 Tips For Frying Modak During Ganpati Festival 2025: तळणीचे मोदक तळणं अनेकजणींना खूप अवघड जातं. म्हणूनच त्यावरचे हे काही खास उपाय पाहा..(why do modak get burst in kadhai while frying?)

4 tips for frying modak during Ganpati festival 2025, why do modak get burst in kadhai while frying? | तळणीचे मोदक तळताना कढईतच फुटतात? ४ टिप्स- सारण बाहेर येऊन तेल खराब होणार नाही 

तळणीचे मोदक तळताना कढईतच फुटतात? ४ टिप्स- सारण बाहेर येऊन तेल खराब होणार नाही 

Highlightsतळणीचे मोदक करण्यासाठी सुरुवातीला आपण कणकेची जी पुरी लाटतो ती जर व्यवस्थित लाटली गेली तर मोदक फुटत नाहीत.

गणरायाचं आगमन आता लवकरच घरोघरी होणार आहे. आता गणपती येणार म्हणजे त्याच्या नैवेद्यासाठी इतर कितीही आणि कोणतेही पदार्थ असले तरी मोदक मात्र हवेतच. मोदक करण्याच्या कित्येक वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातल्या जास्त प्रचलित पद्धती म्हणजे उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक. कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडला तर बहुसंख्य ठिकाणी आणि विशेषत: मराठवाड्यात तर तळणीचे मोदकच केले जातात. तळणीचे मोदक करताना अनेकजणींना अशी अडचण येते की ते मोदक कढईतच फुटून जातात आणि सगळं सारण बाहेर येतं. त्यामुळे मग तेलही खराब होतं. कधी कधी मोदक फुटतो आणि तेल उडून अंगावरही येतं (4 Tips For Frying Modak During Ganpati Festival 2025). हे सगळं टाळण्यासाठी तळणीचे मोदक तळताना काय काळजी घ्यायला हवी ते पाहूया..(why do modak get burst in kadhai while frying?)

 

तळणीचे मोदक तळताना कढईमध्येच फुटू नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?

१. तळणीचे मोदक करण्यासाठी सुरुवातीला आपण कणकेची जी पुरी लाटतो ती जर व्यवस्थित लाटली गेली तर मोदक फुटत नाहीत. यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट अशी करा की पुरी खूप पातळ किंवा पसरट लाटू नका. जर पातळ पुरी लाटली तर तर ती तळताना फुुटण्याची शक्यता जास्त असते.

हरितालिका: उपवासाच्या दिवशी ॲसिडीटी वाढून डोकं दुखतं? ६ नियम पाळा, उपवासाचा त्रास होणार नाही

२. दुसरी गोष्ट म्हणजे काही जणी पुरी मध्यभागी खूप पातळ लाटतात आणि तिचे काठ जाडसर ठेवतात. खरंतर याच्या अगदी उलट केलं पाहिजे. पुरी लाटताना ती मध्यभागी थोडी जाडसर ठेवा आणि तिचे काठ पातळ लाटा. यामुळे मोदकाच्या पाकळ्याही अगदी व्यवस्थित घालता येतात आणि मोदक तळताना फुटत नाहीत.

 

३. मोदकामध्ये जे सारण भरणार असाल ते गरजेपेक्षा जास्त भरलं तरीही मोदक तळताना फुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सारण भरण्याचं प्रमाण अगदी अचूक जमून आलं पाहिजे. कमी झालं तर मोदकाची चव बिघडते आणि जास्त झालं तर मोदक फुटण्याची शक्यता असते.

Dandruff: जावेद हबीब सांगतात डोक्यातला कोंडा घालवून केस गळणं थांबविण्याचा सगळ्यात सोपा उपाय

४. तळणीच्या मोदकामध्ये जे सारण असतं त्यात किसलेले खोबरे असते. ते जर थोडे कडक असेल तर त्याच्या टोकदारपणामुळेही पुरी फाटते आणि मोदक तळताना फुटतो. त्यामुळे खोबरे अगदी बारीक छिद्र असणाऱ्या किसनीने किसून घ्या. 

 

Web Title: 4 tips for frying modak during Ganpati festival 2025, why do modak get burst in kadhai while frying?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.