अनेक जण फ्रिजच्या वरचा भाग एक्स्ट्रॉची जागा म्हणून वापरतात आणि तिथे काहीही ठेवतात. पण फ्रिजच्या वर काही वस्तू ठेवणं धोकादायक किंवा नुकसानकारक ठरू शकतं. कारण फ्रिज चालू असताना वरचा भाग गरम होतो, तसेच कंपन (vibration) ही निर्माण होते. त्यामुळे काही वस्तू तिथे ठेवणं टाळायला हवं.
सर्वात आधी मोबाइल फोन. फ्रिजच्या वर ठेवलेला फोन सतत उष्णतेच्या संपर्कात येतो, ज्यामुळे बॅटरी लवकर खराब होऊ शकते. (4 things you should never keep on the fridge top, know why )काही वेळा overheating मुळे फोनचं आयुष्य कमी होतं. तसंच खाद्य पदार्थ (जसे की ब्रेड, स्नॅक्स, फळं) फ्रिजवर ठेवू नयेत. फळांची बास्केट फ्रिजवर ठेवायची अनेकांना सवय असते. मात्र त्याचा फळांवर परिणाम होऊ शकतो. फ्रिज सतत उष्णता जनरेट करत असतो. उष्णता आणि धूळ यामुळे ती फळे लवकर खराब होतात किंवा त्यांची चव बदलते. औषधे देखील फ्रिजवर ठेवणं टाळा. बऱ्याच घरात फ्रिजवर गोळ्यांचा डबा ठेवला जातो. जास्त तापमानामुळे औषधांची परिणामकारकता कमी होऊ शकते, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तसंच आवरण प्लास्टिकचं असल्याने परिणाम होतो.
इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसं की लॅपटॉप, चार्जर, पॉवर बँक या गोष्टी फ्रिजवर ठेवणं टाळावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एअरफोन्स आणि मोबाइल हमखास फ्रिजवर ठेवला जातो. उष्णता आणि कंपन यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं. तसंच पाण्याच्या बाटल्या किंवा जड वस्तू वर ठेवल्यास त्या पडण्याचा धोका असतो, विशेषतः फ्रिजचा दरवाजा उघडताना. त्यामुळे जड सामान फ्रिजवर ठेवणे टाळा.
फ्रिजची काळजी घेताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या वरचा भाग मोकळा ठेवणं. त्यामुळे उष्णता व्यवस्थित बाहेर पडते आणि फ्रिज जास्त कार्यक्षमतेने चालतो. फ्रिजच्या मागे आणि बाजूंना थोडी जागा ठेवणंही गरजेचं असतं, जेणेकरून हवा खेळती राहील. एकंदरीत काय तर फ्रिज मोकळा राहीला पाहिजे. आत सामान भरा मात्र त्याच्यावर काही ठेवू नका. ती जास्तीची जागा नसते. ती रिकामीच राहायला हवी. उष्णता आणि कंपनामुळे वस्तू खराब होतात आणि अति लोड असल्यामुळे फ्रिजही खराब होतो.
Web Summary : Don't store phones, food, medicines, or electronics on your fridge. Heat and vibrations can damage them and reduce the fridge's efficiency. Keep the top clear for ventilation.
Web Summary : फ्रिज के ऊपर फोन, खाना, दवाइयाँ या इलेक्ट्रॉनिक्स न रखें। गर्मी और कंपन उन्हें नुकसान पहुंचा सकते हैं और फ्रिज की दक्षता को कम कर सकते हैं। वेंटिलेशन के लिए ऊपर की जगह खाली रखें।