lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > संत्री गोड आहे की आंबट कसे ओळखाल? ४ जबरदस्त टिप्स-न खाताही सेकंदात ओळखाल रसाळ संत्री

संत्री गोड आहे की आंबट कसे ओळखाल? ४ जबरदस्त टिप्स-न खाताही सेकंदात ओळखाल रसाळ संत्री

4 secret tips to pick and choose a perfect orange : रसाळ-गोड संत्री विकत घेताना लक्षात ठेवा ४ टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2024 05:59 PM2024-04-05T17:59:37+5:302024-04-05T18:00:27+5:30

4 secret tips to pick and choose a perfect orange : रसाळ-गोड संत्री विकत घेताना लक्षात ठेवा ४ टिप्स..

4 secret tips to pick and choose a perfect orange | संत्री गोड आहे की आंबट कसे ओळखाल? ४ जबरदस्त टिप्स-न खाताही सेकंदात ओळखाल रसाळ संत्री

संत्री गोड आहे की आंबट कसे ओळखाल? ४ जबरदस्त टिप्स-न खाताही सेकंदात ओळखाल रसाळ संत्री

उन्हाळा सुरु झाला की, लोकल ट्रेनमध्ये संत्री, चिकू घेऊन विक्रेता फळे विकायला येतात (Orange Tips). मुख्य म्हणजे संत्री अधिक प्रमाणात विकले जातात. संत्री घेऊन येणारी व्यक्ती, 'ताई संत्री खूप गोड आणि रसाळ आहे; विकत घे' असे म्हणते तर खरी,पण बाहेरून संत्री गोड आणि रसाळ असेलच, हा अंदाज बांधणं जरा कठीणच जातं (Summer Special). बऱ्याच महिला ट्रेनमध्ये बसून संत्री खातात, किंवा घरी जाऊन सोलून आरामत खातात.

संत्री जर चवीला आंबट असेल तर, संपूर्ण जिभेची चव बदलते. पण जर संत्री गोड असेल तर, खायला आणि त्याचा ज्यूस प्यायला भन्नाट लागतो. पण संत्री गोड आहे की नाही, हे बाहेरून ओळखायचे कसे? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. संत्री खरेदी करताना आपण ४ गोष्टी नक्कीच करून पाहू शकता. यामुळे रसाळ संत्री विकत घेणं सोपं होईल(4 secret tips to pick and choose a perfect orange).

लोकल मार्केटमधून विकत घ्या

सुपरमार्केटपेक्षा आपण बाजारातून संत्री खरेदी करू शकता. सुपरमार्केटमध्ये संत्र्यांची किंमत जास्त असू शकते. शिवाय ते फ्रेश असतील असे नाही. बाजारात आपल्याला संत्री ताजी आणि रसाळ मिळतील. जे चवीला गोड असतात.

फळ हातात घेऊन पाहा

करिना कपूरला आवडतो स्पेशल दाल तडका, पाहा फोडणी घालण्याची तिची अनोखी पद्धत

संत्र्याचे वजन तपासून पाहा. यासाठी संत्री हातात घ्या, जर वजनाने जड लागत असेल, तर संत्री गोड आहे हे समजा. फळाचे अधिक वजन म्हणजे अधिक रस असे गणित असते. आपण गंधावरूनही फळ गोड आहे की नाही हे ओळखू शकता.

रंगावरून संत्री खरेदी करा

संत्र्याचा रंग हा केशरी किंवा अधिक पिकल्यावर त्याचा रंग हिरवट होत जातो. या दोन्ही पैकी एका रंगाचे संत्री विकत घ्या. अर्धवट हिरवा किंवा केशरी रंगाचे संत्री हे चवीला गोड असतात. शिवाय संत्र्याचे पोटाचे बटण देखील संत्र्याचे गोडवा दर्शवते.

२ कप रवा आणि पाणी, रव्याच्या कुरड्या करण्याची इन्स्टंट रेसिपी; फुलतात तिप्पट-चवही जबरदस्त

गंध घेऊन रसाळ संत्र्याची निवड करा

आपण गंधावरून देखील संत्री गोड आहे, की नाही हे तपासून पाहू शकता. संत्री विकत घेताना त्याचा गंध घ्या. जर संत्रीमधून मधुर सुगंध येत असेल तर ते फ्रेश आहे हे समजा. शिवाय संत्री गोड आणि रसाळ असते. त्यामुळे संत्री विकत घेताना त्याचा गंध तपासा.

Web Title: 4 secret tips to pick and choose a perfect orange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.