आपण सर्वजण सहसा चहा किंवा इतर कोणताही गोड पदार्थ बनवण्यासाठी साखर वापरतो. पण जर चुकून कुठेतरी साखरेचा दाणा पडला तर मुंग्याच मुंग्या दिसतात. ही समस्या टाळण्यासाठी अनेकदा साखरेचा डबा घट्ट बंद करतात. परंतु बर्याच वेळा कितीही प्रयत्न केले तरी मुंग्या डब्यात शिरतात. अशावेळी साखरेच्या डब्यातून मुंग्यांना बाहेर काढणं अवघड होऊन बसतं. काही लोक कंटाळून साखर फेकून देतात. पण आता असं काही करण्याची गरज नाही. सोप्या घरगुती उपायाने साखरेतून मुंग्या सहज बाहेर काढता येतात, त्याबद्दल जाणून घेऊया...
ऊन आणि लवंग
- साखरेतून मुंग्या काढण्यासाठी सर्वप्रथम साखर एका मोठ्या प्लेट पसरवा.
- आता ती १०-१५ मिनिटं उन्हात ठेवा.
- यानंतर, त्यात ५-६ लवंगा टाका.
- लवंगाचा वास आणि उन्हामुळे मुंग्या बाहेर पडतात.
दालचिनी
- मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही दालचिनी वापरू शकता.
- सर्वप्रथम साखर काढून प्लेटमध्ये पसरवा.
- आता त्यात दालचिनीचे ४-५ तुकडे ठेवा.
- काही वेळाने तुम्हाला दिसेल की मुंग्या गायब झाल्या आहेत.
गरम पाणी
- साखरेतून मुंग्या काढण्यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या. पाणी इतकं गरम करू नका की साखर वितळेल.
- एका प्लेटमध्ये साखर काढा आणि गरम पाण्याच्या मध्यभागी एक भांड ठेवून त्यावर साखरेची प्लेट ठेवा.
- काही वेळाने तुम्हाला दिसेल की मुंग्या बाहेर आल्या आहेत.
- १० मिनिटे ठेवल्यानंतर, साखर परत डब्यात भरून ठेवा.