सध्या सगळीकडेच थंडीचा कडाका खूप जास्त वाढलेला आहे. अगदी स्वेटर घालून, शाल पांघरुणही अंगातली थंडी काही कमी होत नाही. अशा थंड वातावरणाचा परिणाम अन्नपदार्थांवरही होतोच. म्हणूनच या थंडगार वातावरणात दही लवकर लागत नाही. दूध विरजायला खूप वेळ लागतो. शिवाय दूध विरझायला खूप वेळ लागत असल्याने तयार झालेलं दही घट्ट, गोड असेलच हे सांगता येत नाही (3 tricks for making curd or dahi in winter). म्हणूनच पुढे सांगितलेल्या काही टिप्स पाहा आणि त्यानुसार दही लावण्याचा प्रयत्न करा.(cooking tips for making thick curd in winter)
हिवाळ्यात दही लवकर लागण्यासाठी टिप्स..
१. आपल्याला माहितीच आहे की पुरेशी उष्णता मिळाल्यानंतरच दही चांगलं लागतं आणि हिवाळ्यात नेमका त्याच गोष्टीचा अभाव असतो.
रात्री नेहमीच खिचडी करण्याऐवजी करा चमचमीत टोमॅटो राईस, झटपट होणारी सुपर टेस्टी रेसिपी
त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दिवसांत दही लावण्यापुर्वी दूध चांगलं उकळवून थोडं आटवून घ्या. यानंतर दूध थोडं गरम असतानाच त्यामध्ये विरजण लावा. एरवी आपण कोमट दुधात विरझण घालतो. पण हिवाळ्यात मात्र गरम दुधात विरझण घालावे.
२. दुसरी गोष्ट म्हणजे कुकर थोडं गरम करून घ्या आणि दही ज्या भांड्यामध्ये लावायचं आहे ते भांडं गरम कुकरमध्ये घालून ठेवा. कुकरच्या आतमध्ये तयार झालेल्या उष्णतेमुळे दही थोडं लवकर लागेल. गरम झालेलं कुकर दही ठेवून तसंच उघडं ठेवू नका. कारण ते बाहेरच्या थंड वातावरणामुळे लगेच पुन्हा थंड होतं. त्यामुळे त्याच्यावर एखादा जाडसर कपडा घाला.
जायफळाचं होममेड क्रिम, रोज रात्री चेहऱ्याला लावा- त्वचेवर एकही डाग राहणार नाही, सौंदर्य खुलतच जाईल
३. थंडीच्या दिवसांत दही लावण्यासाठी तुम्ही मायक्रोवेव्हचाही वापर करू शकता. मायक्रोवेव्ह प्री- हिट करून गरम करून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये दह्याचं भांडं ठेवा. उबदारपणामुळे लवकर दही लागेल.
