Lokmat Sakhi >Food > कैरीच्या लोणच्याला बुरशी आली? ३ उपाय लगेचच करा, लोणचं वाया जाणार नाही- चवही चांगली राहील

कैरीच्या लोणच्याला बुरशी आली? ३ उपाय लगेचच करा, लोणचं वाया जाणार नाही- चवही चांगली राहील

3 Tips To Protect Mango Pickle From Fungus: कैरीच्या लोणच्याला बुरशी आली असेल तर हे काही उपाय तातडीने करून पाहा. लोणचं फेकून द्यावं लागणार नाही.(what to do if mango pickle got fungus?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2025 12:08 IST2025-06-28T12:07:47+5:302025-06-28T12:08:39+5:30

3 Tips To Protect Mango Pickle From Fungus: कैरीच्या लोणच्याला बुरशी आली असेल तर हे काही उपाय तातडीने करून पाहा. लोणचं फेकून द्यावं लागणार नाही.(what to do if mango pickle got fungus?)

3 Tips to protect mango pickle from fungus, how to keep pickles from getting fungus, what to do if mango pickle got fungus | कैरीच्या लोणच्याला बुरशी आली? ३ उपाय लगेचच करा, लोणचं वाया जाणार नाही- चवही चांगली राहील

कैरीच्या लोणच्याला बुरशी आली? ३ उपाय लगेचच करा, लोणचं वाया जाणार नाही- चवही चांगली राहील

Highlightsवेळीच उपाय  केले नाहीत तर सगळं लोणचं फेकून देण्याची वेळ येते.

उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची सुरुवात यांच्यामधलं खवय्यांसाठीचं एक आकर्षण म्हणजे घरोघरी घातलं जाणारं कैरीचं लाेणचं. पहिला पाऊस पडला की कैरीचं लोणचं घालण्याची लगबग सुरू होते. कैऱ्यांची खरेदी, त्या फोडून घेणे, बरण्या बघून ठेवणे, मसाला तयार करणे, लोणच्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहून ठेवणे अशी कित्येक कामं या दिवसांत वाढलेली असतात. मोठ्या हौशीने आपल्याला पाहिजे तसं लोणचं घातलं जातं. पण काही घरांमध्ये नेमकं लोणचं घातलं की ते सुरुवातीचे १५- २० दिवस चांगलं राहातं आणि नंतर मात्र त्यावर बुरशी यायला सुरुवात होत जाते (what to do if mango pickle got fungus?). यावर जर वेळीच उपाय  केले नाहीत तर सगळं लोणचं फेकून देण्याची वेळ येते. असं होऊ नये म्हणून लोणच्यावर बुरा दिसताच या काही गोष्टी तात्काळ करा.(3 Tips To Protect Mango Pickle From Fungus)

लोणच्याला बुरा येऊ लागला तर काय उपाय करावे?

 

१. खराब भाग काढून टाका

लोणच्याची बरणी  उघडल्यानंतर तुम्हाला लोणच्याचा जो भाग पांढरा पडलेला दिसेल तो भाग तर काढून टाकाच. पण त्यासोबतच त्याच्या आजुबाजुचं काही लोणचंही काढून घ्या.

डॉक्टर सांगतात पावसाळ्यात पाव-ब्रेड खाणं टाळा; त्यामुळे वाढतोय 'हा' आजार मोठ्या प्रमाणात

कारण इतर भागावरही बुरशी पसरलेली असते जी चटकन डोळ्यांना दिसत नाही. काही जणी फक्त बुरा लागलेलं लोणचंच काढून घेतात, पण तेवढं पुरेसं नाही. यानंतर बरणी व्यवस्थित झाकण लावून ठेवा आणि दररोज ती उघडून तिच्यातलं लोणचं खाली- वर या पद्धतीने हलवून घ्या.

 

२. मीठ आणि तेल यांचं प्रमाण

आपल्याला माहितीच आहे की लाेणच्यासाठी मीठ हे एखाद्या प्रिझर्व्हेटीव्हप्रमाणे काम करतं. त्यामुळे लोणच्यामध्ये ते योग्य प्रमाणातच हवं.

Shefali Jariwala Death: अखेर शेफाली जरीवालाची 'ही' इच्छा झाली पूर्ण, म्हणाली होती मला मरेपर्यंत... 

काही वेळा लोणच्यामध्ये मीठ कमी पडलं म्हणूनही ते खराब होऊ शकतं. तुमच्या लोणच्याच्या बाबतीत तर तसं झालेलं नाही ना हे एकदा तपासून घ्या आणि त्यात मीठ किंवा तेलाचं प्रमाण वाढवा.

 

३. फ्रिजमध्ये ठेवा

लोणच्यावर आलेली बुरशी काढून टाकल्यानंतर, ते रोज हलवल्यानंतरही लोणच्यावर पुन्हा बुरशी येत असेल आणि त्याचा वासही यायला लागला असेल तर शेवटचा उपाय म्हणजे लोणच्याचा खराब झालेला भाग काढून टाकणे आणि ते लोणचं छोट्या छोट्या बरण्यांमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवणे. 

 

Web Title: 3 Tips to protect mango pickle from fungus, how to keep pickles from getting fungus, what to do if mango pickle got fungus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.