इडली डोसा हा घरातल्या अनेक जणांचा आवडीचा पदार्थ. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी इडली, डोसा करण्याचा घाट घातला जातोच. हल्ली इडली, डोश्याचं पीठ विकत मिळतं. पण त्याला घरच्या पिठासारखी चव नसते. शिवाय ते तयार करताना स्वच्छतेची काळजी घेतलेलीच असेल याचीही खात्री नाही. त्यामुळे अनेक जणी घरीच इडली, डोसा पीठ करायला प्राधान्य देतात. पण पावसाळ्यात थंड हवेमुळे इडलीचं पीठ लवकर आंबत नाही. ते व्यवस्थित फर्मेंट झालं नाही तर इडल्याही चांगल्या फुगत नाहीत. शिवाय त्यांना हवी तशी चवही येत नाहीत. म्हणूनच या काही टिप्स लक्षात ठेवा (3 tips for the fast fermentation of idli batter in monsoon). यामुळे इडलीचं पीठ व्यवस्थित आंबेल आणि शिवाय इडल्याही अगदी मऊसूत होतील.(3 tips for the soft, light weight idli)
पावसाळ्यात इडलीचं पीठ लवकर आंबविण्यासाठी उपाय
१. मेथ्यांचा वापर
एरवी तुम्ही इडलीचं पीठ भिजवताना त्यात मेथ्या नाही घातल्या तरी चालते. पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र इडलीसाठी तांदूळ भिजत घालतानाच त्यामध्ये थोड्या मेथ्या घाला. मेथ्यांमुळे पीठ लवकर आंबविलं जातं आणि इडल्याही मऊ होण्यास मदत होते.
तुळशीची पानं ‘अशी’ लावा केसांना, काळेभोर-घनदाट केस पाहून कुणीही विचारेल लावता काय केसांना?
२. गरम पाणी
इडली करण्यासाठी भिजवलेली डाळ आणि तांदूळ जेव्हा तुम्ही मिक्सरमधून बारीक कराल तेव्हा ते वाटून घेताना मिक्सरच्या भांड्यात थंड पाण्याऐवजी गरम पाणी घाला. यामुळे पिठाचं तापमान वाढतं आणि ते लवकर आंबविण्यासाठी मदत होते.
३. गरम कुकरचा वापर
पावसाळ्यात, हिवाळ्यात सगळीकडे थंड हवा असते. त्यामुळे पीठ लवकर आंबविलं जात नाही. त्यासाठी त्याला पुरेसं उबदार वातावरण, उष्णता मिळण्याची गरज असते.
किचनमधला कचरा रोपांसाठी ठरतो सुपर टॉनिक! बाग होईल हिरवीगार, फुलंही येतील भरपूर
यासाठी एक सोपा उपाय करता येतो. हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे असणारं कुकर घ्या. ते गॅसवर ठेवून थोडं गरम करून घ्या. यानंतर गॅस बंद करून टाका आणि गरम झालेल्या कुकरमध्ये इडलीच्या पिठाचं भांडं ठेवून द्या. कुकरचं झाकण लावून टाका. पीठ लवकर फर्मेंट होईल.