Join us

शुद्ध मध ओळखण्याचे ३ सोपे उपाय! विकत आणलेला मध शुद्ध आहे की गुळाचा पाक, लगेच कळेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2025 15:34 IST

3 easy ways to identify pure honey! see how to test honey at home , very easy steps : तुम्ही खाता ते मध चांगले आहे का ? पाहा कसे तपासायचे.

आजकाल भेसळयुक्त अन्न म्हणजे अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. एखादी खाद्यकंपनी त्यांच्या पदार्थांमध्ये रसायनांची, निम्न दर्जाच्या पदार्थांची भेसळ करते ते पदार्थ तसेच विकले जातात आणि लोकांना ते खावे लागतात. अगदी मोजक्या कंपनी असतील ज्या शुद्ध नैसर्गिक पदार्थ विकतात. (3 easy ways to identify pure honey! see how to test honey at home , very easy steps )लोकांनाही आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थ भेसळयुक्त असतात हे कळून चुकले आहे. त्याची तपासणी करण्याच्या पद्धतीही लोकं जाणतात. आपण पौष्टिक समजून जे खातो त्यामुळे आपले आरोग्य आणखी खराब होत असेल तर असे पदार्थ ओळखता येणे फार महत्त्वाचे असते.  जसे की मध. मध वजन कमी करण्यासाठी तसेच घसा, त्वचा आणि आरोग्य छान राहावे यासाठी मधाचा वापर केला जातो. २०२० मध्ये CSE(center of science and environment) ने सांगितल्यानुसार,१३ पैकी १० भारतीय मध कंपनी त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये भेसळ करतात. शुद्ध मध विकत नाहीत. घरीच काही सोप्या चाचण्या करुन मधाचा दर्जा तपासता येतो. 

१. एक ग्लास भरुन पाणी घ्यायचे. पाण्यात चमचाभर मध ओतायचे. शुद्ध मध ग्लासच्या तळाशी बसते. पण जर भेसळयुक्त मध असेल तर ते पाण्यात वर-खाली होत राहते. त्याचे कण पाण्यात पसरतात. असे मध वापरणे टाळा.  

२. एका वाटीत मध घ्या आणि ते गरम करा. मोजून ३० सेकंदासाठी तापवायचे. शुद्ध मधाला उकळी येते आणि त्याला फेस येतो. जसे साखर गरम केल्यावर बुडबुडे येतात अगदी तसेच. मात्र मधात रसायनांचे प्रमाण जास्त असेल तर ते करपते. त्याचा रंग गडद होतो आणि करपट वासही येतो. 

३. शुद्ध मध जरा जास्त घट्ट असते. लोकांना वाटते की मध पातळ आणि एकतारी असेल तर ते चांगले असते. मात्र मुळात तसे नसून घट्ट मध शुद्ध आणि चांगल्या दर्जाचे असते. अगदी शुद्ध मध मिळणे तसे कठीणच पण फारच पातळ मध अजिबात वापरु नका. जरा घट्ट असलेलेच वापरा.  

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सहोम रेमेडीआरोग्य